Dec 31, 2010

Welcome 2011नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 


Happy New Year 


Welcome 2011

Dec 30, 2010

दिवस तिसरा


तिस-या दिवशी लवकरच निमंत्रित कवींच्या काव्यवाचनाला उपस्थित राहिलो. महाराष्ट्राच्या काना कोप-यातून आलेल्या कवींनी उत्कृष्ट काव्यवाचन केले. सामाजिक, राजकिय, विनोदी, गज़ल, हलक्या-फुलक्या अशा वेगवेगळ्या रचना सादर केल्या. 

हा कार्यक्रम संपल्यावर परत एकदा ’काव्यजागर’ मधे जाऊन ’काळ-वेळ’ ही आणखी एक कविता वाचली. तेथून आमच्या ’निल पुष्प साहित्य मंडळ, ठाणे’ च्या स्टाँल वर आमचे नविन प्रकाशित झालेले कवितासंग्रह ’काव्योत्सव-३’ (ज्याचे प्रकाशन साहित्य संमेलनात अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले, ज्यात माझ्या दोन कविता आहेत.) घेण्यासाठी गेलो.

तेथे मंडळाचे उपाध्यक्ष म्हणाले आलाच आहेस तर थोडा वेळ स्टाँलवर बस. मी पण विचार केला थॊडा वेळ थांबू. आमच्या नविन कवितासंग्रह ’काव्योत्सव-३’ वर भर देउन थोडा आक्रमक पवित्रा (Aggressive Sales Marketing) घेत संध्याकाळ पर्यंत चांगल्या पैकी व्यवसाय झाला. उपाध्यक्ष पण खुश झाले, दोन दिवस का आला नाहिस म्हणून विचारल. (दोन दिवस जर स्टाँलवर आलो असतो, तर चांगल्या कार्यक्रमांना मुकावे लागले असते, हे मनात) मी पण भलताच खुश होतो, अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनात दोन स्वरचित कविता वाचल्या, 
आमच्या निलपुष्प साहित्य मंडल, ठाणे च्या स्टाँलवर उभा राहुन आमचा नविन कवितासंग्रह व इतर पुस्तके विकली. अशा प्रकारे थोडयाफार प्रमाणात का होईना साहित्याची सेवा केली.

आशा रीतीने ठाण्यातील संमेलन यशस्वी केल्या बद्द्ल सगळ्याचे एक ठाणेकर म्हणून आभार.

दिवस दुसरा.दुस-या व तिस-या दिवसाचा गोषवारा लिहायला अंमळ उशिरचं झाला, त्यास साहित्य संमेलनाचा हँगऒव्हर कारणीभूत आहे. ते साहित्यिक वातावरण, रसिक वाचकांची उपस्थिती, संमेलनात ऎकलेल्या एकसे एक चांगल्या कविता मनातून व डोक्यातून जातच नव्हत्या. साहित्याचा हँगऒव्हर कसा असतो, व तो किति काळ राहू शकतो याचा अनुभव मला ठाण्याच्या ८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनात आला.

संमेलन काळात (खर म्हणजे आधी पासुनच) ठाणे शहर साहित्यमय झाले होते, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, मोठमोठ्या साहित्यिकांची उपस्थिती वातावरणात भर घालत होती. ठाणेकरांच्या हे पथ्यावरच पडले, व त्यांनी संमेलनाला उदंड प्रतिसाद दिला. तसेच अनेक रसिकांनी महाराष्ट्राच्या काना कोप-यातून येऊन ठाणेकरांना आदरतिथ्याची संधी दिली.

दुस-या दिवशी मी तसा आनंदीच होतो, नवकवींसाठीचा कविता वाचनाचा कार्यक्रम ’काव्यजागर’ होता. नवकवींसाठी असलेल्या ’लोकशाहिर विठ्ठल उमप’ व्यासपिठावर मी माझी ’वेदनेची संवेदना’ ही कविता ऎकविली. संमेलनात कविता ऎकवायला मिळाली या भावनेनेच ऊर भरुन आल, कृतकृत्य झाल्या सारख वाटल. आणखी एखादी कविता वाचायला मिळेल तर बर होईल असा मनात विचार आला. पण तिस-या दिवशी निमंत्रित कवींचे काव्यवाचन होते, म्हणून लवकर निघालो, जास्त जागत बसलो नाही.Dec 25, 2010

दिवस पहिला.

८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस पार पडला.
सगळ्या साहित्य संमेलनासारखेच वादाचे गालबोट ८४ व्या संमेलनालाही लागले.
दादोजी कोंडदेवांचे नाव बदलण्याची मागणी संभाजि ब्रिगेडने केली, नाहीतर संमेलन उधळून लावण्याची धमकी दिली.
पण आयोजकांनी असल्या धमकीला भीक न घालता, नाव बदल केला नाही, यासाठी ते (आयोजक) अभिनंदनास पात्र आहेत.

दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते का नव्हते हा एक वेगळा विषय/वाद आहे. पण ऎन संमेलनाच्या तोंडाशी नाव बदलण्याची मागणी करुन अयोजकांना व साहित्यप्रेमी जनतेला ब्लँकमेल करायची संधी साधुन संभाजि ब्रिगेडच्या गुंडांनी चांगलीच प्रसिद्धी प्रसारमाध्यमांनमध्ये मिळवली.पहिल्या दिवशी कविता वाचनाच्या कार्यक्रमाला हजर राहून मी ही साहित्याचे काही कण वेचायचा प्रयत्न केला. खुप आनंद वाटला, काही छान कविता ऎकायला पण मिळाल्या.
शिवाय पुस्तकांच्या प्रदर्शनात फिरुन घेतले. ठाणे/मुंबई/पुण्याच्या लोकांना पुस्तकांच्या प्रदर्शनाचे जास्त अप्रूप नाही, ती आम्ही बाराही महिने पाहतो. असो सांगायचा मुद्दा हा की साहित्याची गंगा, ठाण्यातील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माझ्या दारी आली आणि मीही तीत मनोसोक्त डुंबुन घेतले


रात्री ९ वा पोटात कावळ्यांचे संमेलन भरले, सगळे सुरेल आवाजात कविता वाचन करायला लागले. मलाही काही सुचत नव्हते. तेव्हा विचार केला, भाकरिचा प्रश्न सोडवायला हवा. नाहितरी काही कविंनी म्हंटलेच आहे, भाकरीचा  प्रश्न सोडवताना कविता सापडली/हरवली
८४ व्या संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनीही आपल्या भाषणात आधी जीवन (भाकरी) नंतर साहित्य (कविता) असचं काहितरी म्हंटल्याचे अंधुकसे आठवले आणि माझे पाय आपोआप घराकडे परतिच्या वाटेकडे वळले.

Dec 10, 2010

८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन ठाणे.


८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे होणार आहे, तुम्ही त्याला हजर राहणार ना?

एक ठाणेकर या नात्याने मी तुम्हाला मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण देतो.....

८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनाला (ठाणे) यायचहं......

Oct 23, 2010

Life is a miracleLife is a Miracle - My 5th pick in Parallel Film Festival.

Emir Kusturnica's Serbian-Croatian movie, which was showcased in 2004 Cannes Film Festival.

It's a story about a family on the back drop of Serbo-Bosnian war.
I like most of Emir Kusturnica's film such as 'Underground' , 'Black Cat White Cat', 'Time of Gypsies'.
This film is wonderful, full of emotions.
Hope you will like it.

Stalag 17Stalag 17 - My 4th pick in Paralle Film Festival.
Movie about american prisoner's of war in WW2

El Alamein - In the Line of FireEl Alamein - My 3rd pick in Parallel Film Festival
An Italian movie on battle of El Amamein, an Italian perspective.

 मला ही मुव्ही आवडली, तुम्हालापण आवडेल.

RUN LOLA RUNRun Lola Run - My 2nd pick in Parallel Film Festival
A German film about a girl 'Lola' , who run to save her boyfriend.


धाव लोला धाव/ पळ लोला पळ
मी या मुव्ही बद्द्ल १९९९ मधे’लोकसत्ता’त वाचल होत. तेव्हा पासुन मला हा चित्रपट पाहायचा होता. पण एवढ्या दिवसानंतर महुर्त मिळाला.
It was worth waiting.
A good movie
Rating - 3 1/2 *** out of 5.

Oct 19, 2010

Luna Papa - Tazik film.My 1st pick in Parallel Film Festival.
A Tazik film. a story of a 17 yr old girl, who gets pregnant & the man runs away.
The unborn child of the girl narrates the story.

A fantastic touchy film. watch the film before you tube deletes it. ;)

मुंबई फिल्म फेस्टिवल


१२ वा मामि मुंबई फिल्म फेस्टिवल २१ आँक्टोबरला सुरु होत आहे.12 Mami - Mumbai Film Festival is starting on 21 October , & m starting my own Parallel Film Festival on my blog.
Everybody is invited & Welcome.

I wiil post World's Best movies on my blog, so enjoy.


मुंबई फिल्म फेस्टिवलला खुप खुप शुभेच्छा.
Best of Luck for Mami - Mumbai Film Festival.Oct 12, 2010

घेरावहृदयावर तू दिलेला घाव आहे
कोरलेले त्यावर तुझे नाव आहे

आसवांना तू दिले परिमाण माझ्या
घेतला तू या मनाचा ठाव आहे

ही चर्चा तुझ्या रुपाची रंगलेली
बोलणारा वासनांध जमाव आहे

मी कशाला काळजी करु यातनांची
यातनांचा मज बराच सराव आहे

मागणे त्यांचे असे काहीच नाही
घातला त्यांनी तरी घेराव आहे


Oct 7, 2010

चारोळ्या


चारोळ्या     चारोळ्या     चारोळ्या 
---------     ---------    -----------
सायंकाळी कातरवेळी पक्षी
अपुल्या घरटी पळती
पाउले माझीही सहजच
परतीच्या वाटेवर वळती.


हल्ली एकटा असलो की 
स्वत:लाच प्रश्न विचारतो
खोचक, बोचरे, अवघड
पण उत्तरे देण्याचे टाळतो.
मी असा कोणता
केला होता गुन्हा
शिक्षा ज्याची मला
मिळते पुन्हा पुन्हा.
तुझ्या आठवांचे 
तुषार फुलले,
ह्रुदयात खोलवर
काहीरी हलले.

तुझ्यापासुन दूरजाण्यापूर्वी
मला एकच करायचाय
तुला डोळेभरुन पाहताना
ह्रुदयात साठवायचाय.
माझ काय अस मोठ
मागण होत,
जगू द्या, एवढच
गा-हाण होत. 
Oct 1, 2010

काळ - वेळ


जिवन सगळे कसे सरुन गेले
काळाच्या पडद्याआड विरुन गेले 

बरेचसे करायचे राहुन गेले
थोडेसे जगायचे राहुन गेले

भुतकाळ वर्तमानात स्मरुन गेले
वर्तमान भविष्यात गढून गेले

ऊभे आयुष्य असे जळुन गेले
काही क्षण मात्र तरळून गेले

डोळे आसवांनी भरुन गेले
’मी’ पण माझे गळून गेले

काय राहिले ते स्मरुन गेले
मरताना सगळे आठवून गेलेसाजन - सजनी


मी साजन, तू सजनी
मी ययाति, तू देवयानी

मी आकाश, तू  धरती
मी नल, तू दमयंती

मी रुधीर, तू धमणी
मी कान्हा, तू रुक्मिणी

मी अवकाश, तू अवनी
मी बाजिराव, तु मस्तानी
---------------------------------------------
विडंबन - Parody

मी सैफू, तू करिना
मी सल्लू, तू कटरिना

मी अमित, तू जया
मी अभी,  तू ऎर्श्वया

मी कमळ, तू भ्रमर
मी शाहरुख, तू करन


Sep 26, 2010

खेळखंअडोबा


दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धेचा बोजवारा उडाला
कलमाडी कंपनिनेने खेळखंअडोबा केला

क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारीच्या उचापती
वेटलिफ्टरही मग ऒझे उचलाया लाजती

एकमेकांवर करी आरोपांचे शरसंधान
हे तर धर्नुविद्येतील धनुर्धर महान

पेच-डावपेच लढवी करण्या कुरघोडी
जसे कसलेले पहेलवान-मल्ल आखाडी

उघडे पडल्यावर तोंड लपवित फिरती
जसे काही ५०० मि.ची मँरेथाँन धावती

आपल्या सहका-यांना पाण्यात पाहती
जसे भविष्यातील जलतरणपटु घडवती

जबाबदारीचे चेंडु फर्मास टोलवती
अग्रगण्य टेनिसपटुही मग लाजती

राष्ट्राच्या अब्रूचे जगात धिंडवडे निघाले
काहींचे मात्र पिढयांचे कल्याण झालेह्रदयमंदिर


तुच माझा इश्वर
माझा परमेश्वर
तुला ठेवीले उरी
पुजितो ह्रदयमंदिरी

तुझेच प्रात:स्मरण
तुझेच नामस्मरण
तुझेच उरी प्रार्थना
तुझेच करी आराधना

पुरते संपले द्वैंत
सुरु झाले अद्वैंत
स्थापले ह्रदयमंदिरी
करतो तुझी चाकरी

उरी तुझीच मुर्ती
मुखी तुझीच किर्ती
तुला नव्हते मान्य
तुला मुर्तीपुजा अमान्य

तू फोडले ह्रदयमंदिर
घालत घणाचे प्रहार
करत तलवारीचे वार
तू प्रेयसी नव्हे, बाबरSep 24, 2010

The Curious Case of Benjamin Buttonपरवा ब्रँड पिट चा ’दि क्युरियस केस आँफ बेंजामिन बट्ट्न’ हा चित्रपट HBO वर पाहिला.
वेगळा विषय, वेगळी मांडणी यामुळे खुपच आवडला

यात एका कुटुंबात जे मिल जन्माला येत, ते जन्मत:च वयस्कर (८४ वर्ष) असतं. बाळणपणात मुलाची आई मरण पावते, चिडुन जाऊन बाळाचे वडिल बाळाला स्वत: एका नर्सिंग होम मधे सोडून देतात. नर्सिंग होम मधील एक स्त्री बाळाची जबाबदारी घेते, व त्याला वाढवते.
पुढे ते बाळ, म्हणजेच ’बेंजामिन’ मोठा होतो. प्रत्येक वर्षागणिक तो जास्त तरुण बनतो आणि पुढे काय होऊल यात आपण गुंतुन जातो


 Yesterday saw Brad Pitt's 'The Curious Case of Benjamin Button' on HBO movies. & fall in love with the movie because of It's different story, & different presentation.

In this movie a child who is already old & aging (84 trs) is born in a wealthy family. After giving birth, the mother dies. Father abandons the child on the stair case of the nursing home. A lady working in the nursing home finds the child & decides to take care of the child as it's own.
The child ages in reverse, as he grows he becomes more younger & stronger.


चित्रपट अत्यंत सुंदर आहे, प्रत्येकाने पाहण्यासारखा आहे. ब्रँड पिट वे केंट ब्लँचेट याचा नितांत सुंदर अभिनय, कथानकातील वळणे यामुळे चित्रपट प्रेषणिय बनला आहे.

The movie is absolutely fabulous, & must watch on the list of things to do. Performances of Brad Pitt & Cate Blanchett are marvelous.
so i'm not revealing the story, go & watch the movie on DVD or wait to see on HBO.Sep 17, 2010

प्रेम कधी करु नयेप्रेम कधी करु नये
कुणासाठी झुरु नये
कुणा उरी ठेऊ नये
ह्र्दय कुणा देऊ नये
प्रेम कधी करु नये

स्मृति कुणाची जपू नये
कुणा जीव लावू नये
कुणासाठी रडू नये
जीवा त्रास देऊ नये
प्रेम कधी करु नये

ह्र्दयी कुणा माळू नये
कुणा नेत्री ठेवू नये
अश्रू उगा गाळू नये
कुणासाठी मरु नये
प्रेम कधी करु नये

कुणा उगा स्मरु नये
कुणासाठी जागू नये
उगा स्वप्ने पाहू नये
मनी कुणा ठेऊ नये
प्रेम कधी करु नये


बाल्कनायझेशन्


युरोपात , बाल्कन प्रांति
होता, एक अखंड देश
भिन्न संस्कृति, भाषा, वेश
भिन्न धर्म, भिन्न अभिनिवेश
नाव त्याचे युगोस्लाविया

होते जरि एकवटलेले
नव्हती एकी, एकता
अनेक प्रश्न, तंटे 
भाषा, धर्म, वंश
अनेक कारणे.......

राहिले सदैव भांडत
एकमेकांचे पाय ऒढत
फुटीरवादाची री ऒढत
भंगला, फुटला युगोस्लाविया
निर्मिले क्रोएशिया, मँसेडोनिया
स्लोवेनिया, बोस्निया, सर्बिया

एका अखंड देशाची,
झाली शकले सहा
आपण यातुन शिकुया
भारताचे बाल्कनायझेशन् टाळुयाSep 15, 2010

Real Madrid Vs AFC Ajax

Tonight- Real Madrid Vs AFC Ajax


Jose Murinho Vs Martin Jole
Tonights other matches in UEFA Champions League.

Bayern Munic Vs AS Roma
CFR Cluz Vs FC BAsel
Marseille Vs Spartek Moscow
Zelina Vs Chealse
AC Milan Vs Auxerre
Arsenal Vs Braga
Shakhtar Donetz Vs Partizan Belgrad

so enjoy..........:) ;)


Barca thups Panatheinaikos 5-1FC Barcelona 5-1 Panathinaikos FC


Barcelona thump Panathinaikos 5-1
Barca dominated from the start, many chances in early mins, Barca controlling the game from mid-fielsd.
but still Panathenaikos managed to take lead on counter-attack by Sidney Govou.
just within a minuts Barca levels by Messi goals. & without giving any chance to Panatheinaikos Barca scored 4 more goals. Barca went on to win 5-1.
That was an excellent display of football by Barcelona, hoping to see more of Barca in UEFA.

Sep 14, 2010

I'am excited


UEFA Champions League- group stage starts tonight

Tonight's matches

F C Twente Vs Inter Milan
Werder Bremen Vs Tottenham Hotspurs
Lyon Vs Schalke
Benfica Vs Hopael Tel Aviv
Manchester United Vs Rangers
Bursaspor Vs Valencia
FC Barcelona Vs Panathinaikos
FC Kobenhaven Vs Ruben Kazan

so enjoy European football. 
Sep 11, 2010

!! मंगलमुर्ति मोरया !!
!! गणाधिश जो इश सर्वा गुणांचा ! मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा !!

!! गणपति बप्पा मोरया ! मंगल मुर्तिमोरया !!

Sep 9, 2010

आलिंगन


तोडुन सारे बंधन
तुझे-माझे व्हावे मिलन

हातांत तुझे हात
घ्यावे दिर्घ हस्तालोंदन

मना मनात गुंफुन
जावे निरंतर आंदोलन

ऒठांवरती ऒठ ठेवूनी
घ्यावे प्रदिर्घ चुंबन

तुला भिडावे, विरघळावे
घ्यावे कवेत आलिंगन

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)नमो शारदे


नमो शारदे , वाकदेवी नमामी
तुझा दास गातो तुझी वंदनाही
नवे तेज लाभो, नवी धार लाभो
सदा प्रेम लाभो, सदा कामना ही

नमो शारदे , वाकदेवी नमामी
तुझा दास गातो तुझी वंदनाही

तुझे गीत येवो मनोमंदिरी या
तुझा ध्यास राहो सदा या उराशी
नवी प्रतिभा अन् कल्पना सुचावी
नवे सामर्थ्य दे, सदा कामना ही

नमो शारदे , वाकदेवी नमामी
तुझा दास गातो तुझी वंदनाही

शब्द लालित्य दे, शब्द चापल्य दे
शब्द माधुर्य दे, शब्द सौदर्य दे
शब्दांनीच पुजतो, शब्द पांडित्य दे
तुझा दास मी, मज शब्द स्वामित्व दे

नमो शारदे , वाकदेवी नमामी
तुझा दास गातो तुझी वंदनाही

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


Sep 5, 2010

खुप आनंद वाटतोय.निलपुष्प साहित्यमंडळाच्या मासिक कवितावाचन कार्यक्रमात माझ्या ’ऒढ मिलनाची’ या कवितेस या महिन्याच्या सर्वोतकृष्ट कवितेचा पुरस्कार मिळाला. खुप आनंद वाटतोय.

खाली ’ऒढ मिलनाची’ लिंक देत आहे.
http://sourabhparanjape.blogspot.com/2010/04/blog-post_12.html

Sep 3, 2010

मधुमासका उरी ही आस येथे?
का जिवाला त्रास येथे?

सोडला मी श्वास येथे
संपला वनवास येथे

जोडली मी माणसे ही
जोडले सहवास येथे

सोसल्या ह्या वेदना अन्
भोगले मधुमास येथे

ही विखारी भूक माझी
अन् अभागी घास येथे

का मला छळता उगाचच
मी न कोणी खास येथे

जाणिवा अन् नेणिवांचे
तोडले मी फास येथे

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserve

Aug 31, 2010

डाँक्टर आणि कवीकाही योग अजोड असतात
थोडेसे विजोड असतात
आता हेच बघाना

मी स्वप्निल, रोमँटिक, कवी मनाचा
र्दुदैवाने आजारी पडलो, अन्.........
सुदैवाने हीच्याशी ऒळख झाली

ही डाँक्टर, हुशार, अभ्यासू.......
म्हणतात ना प्रेम आंधळ असत
दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो

ती नेहमी मेरिट लिस्ट मधे
मी नेहमी ब्लँक लिस्ट मधे......
ती सदैव फस्ट बेंच वर
मी सदैव काँलेज कँटिन मधे
मी काव्यात बोलणारा
ती साईंटिफिक बोलणारी

ती यायला उशीर झाला की
मी म्हणतो, ’जीवाची घालमेल होते’.
ती म्हणते, ’थांब ब्लड प्रेशर चेक करते

खुप वेळाने ती दिसली की, मी म्हणतो
’ह्र्दयास गुदगुल्या होतात, जीव भांडयात पडतो’
ती लगेच माझी पल्स चेक करते..........

मी रोमँटिक मूडमधे असलो की म्हणतो, 
तुझ्या प्रेमात मी वेडा-पिसा झालोय....
ही जमिन फिरते, आकाश गरगरते.....
ती लगेच म्हणते, ’चल शुगर चेक करुया’.

अशी आमची जोडी थोडी विजोड आहे
पण खरच अजोड आहे..........

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserve
घाववृत्त  - आनंद  (१२ मात्रा)

ना ना र ना र ना ना 

---------------------------
सारेच साव येथे
बाके बनाव येथे

पाहून चेहरे हे 
देतात भाव येथे                                  

पुसतात लोक सारे 
माझेच नाव येथे 

मरतात रंक तेथे                 
उरतात राव येथे
                                          
माझ्या पराभवाचे
शिजतात डाव येथे

नेते रसातळाला
माझीच हाव येथे

माझ्याच शेवटाला
जमले न गाव येथे

मी लावतॊ उद्यावर
उलटेच दाव येथे

रेखीव श्र्वापदांना    
भलताच वाव येथे

जमतात नाडण्यासी
भॊंदू जमाव येथे

करतात प्रेम जेव्हा
मिळतात घाव येथे

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.
Aug 30, 2010

निवांतवृत्त- आनंद
ना ना र ना र ना ना  (१२ मात्रा)   

---------------------------------------

( इतुकीच खंत आहे )
जगण्यास भ्रांत आहे

जीवात घालमेली
बाहेर शांत आहे

मोठेच संत येथे
कोठे उसंत आहे?

जगण्यास लावणारी
आशा अनंत आहे

दिसतात लोक साधे
किर्ति दिगंत आहे

मेल्यावरी मिळेना
कोठे एकांत आहे?

नाकार तू दु:खाला
सुखास अंत आहे

थडग्यात जाग आली
येथे निवांत आहे

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

Aug 25, 2010

वनवास कितीश्वास किती उश्वास किती 
जगण्याचे हे त्रास किती 

भास किती आभास किती 
दु:ख हे सुग्रास किती 

कुठूनसा आला सुगंध
नुसतेच हे वास किती 

चेहरे का ग्रासलेले?
लोक हे खग्रास किती 

अयोद्धेचा राजकुमार
भोगणार हे वनवास किती 

जीवंतपणी विसरती सारे
मेल्यावर ही आरास किती 
  
-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


 © Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.
Aug 21, 2010

चाँकलेट कुकिज्, काँफी आणि ग़ज़लकुंद मद-धुंद गार हवा
बाहेर सतत पाऊस धारा
रविवारची ती मोहक दुपार
होतो दिसतोय का सूर्य पहात

चाँकलेट कुकिज्, फेसाळत्या काँफीचा आस्वाद
आणि घेत ’सुरेश भटांच्या ग़ज़लेचा रसास्वाद
बँकग्राऊंडला Bu ddha Bar चे इंस्ट्रूमेंटल संगीत
अशी ती रम्य, स्वर्गीय, मंद-धुंद दुपार

नको ती कटकट, नको ती चिकचिक
नको त्या ब्रेकिंग न्युजचा भडिमार
नको ती सासू-सुनांची बकबक
नको ती बाँसची पकपक
नको तो बाजारू, हिडिस नंगा नाच

हवी फक्त आठवडयातून एक दुपार
निवांत, रमणिय, आळसावलेली....
जी असेल फक्त माझी......,
सोबत भटांच्या ग़ज़ला, आणि
पुलंची हसवणारी पुस्तकं
बस् आणखी काही नको.

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

अजाणता राजा

समर्थ रामदास स्वामि आणि छत्रपति शिवाजी महाराज यांची माफी मागुन पुढील कविता सादर करत आहे.
कृपया कशी वाटली ते जरुर कळवा.

अजाणता राजा
------------------------------------------------

भ्रष्टाचाराचा महामेरु!
माफिया, काळाबाजारवाल्यांचा आधारु

अखंड अस्थिरतेचा जनकू!
श्रीमंत राजकारणी

पावसात सडती गव्हाच्या राशी!
अन् जनता उपाशी

तयांची बारगेनिंग पावर!
उपद्रवमुल्य तुळणा कैंची?

मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री!
शेती, खाद्य-सार्वजनिक वितरण मंत्री

अनेक संघटनांच्या प्रमुखपदि!
मिरवति ते मानानी


बारामति आणि शक्ति!
पृष्ठभागी

भ्रष्टवंत, अनितिवंत!
अजाणता राजा


- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

रोज एक कविता लिही.

रोज एक कविता लिही
मन मला सांगत होतं
जर तुला (महा)कवी व्हायच असेल
तर रोज एक कविता लिही

काही गद्यात लिहितात
काही पद्यात लिहितात
काही चारोळ्या पाडतात
काही आरोळ्या ठोकतात
काही गज़लेत रमतात
काही बखरित रटतात

कशाही प्रकारात लिही
रोज एक कविता लिही

खेळातल्या राजकारणावर लिही
राजकारणातल्या खेळावर लिही
शोषितांवर, शोषणावर लिही
भुकेलेल्यांवर, पोट भरलेल्यांवर लिही
आईवर-बाईवर, बापावर-सापावर लिही
माक्स-ऎंगल्सवर, स्टँलिन-लेनिनवर लिही
तू फक्त लिही, लोक असेच महाकवी होतात

मेलेल्या ऊंदरावर, मारत्या बैलावर, शहामृगावर
सारस्वतांवर लिही, विद्रोह्यांवर लिही
स्तनांवर-जनांवर, कापडावर-पापडावर लिही


कशावरही लिही पण लिही, पण    
तू लिही रोज एक कविता लिही

जर तुला (महा)कवी व्हायच असेल
तर रोज एक कविता लिही........

           -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.Aug 18, 2010

एकटा


मी जेव्हा एकटा असतो
तेव्हा खरच चांगला असतो
तस म्हणायला ’एकटा असतो’
पण तसा एकटेपणा सोबत असतो

तो माझी पाठच सोडत नाही
सुखात, जास्त करुन दु:खात
माझ्या सोबतीला असतो
त्याचा मला, मला त्याचा
कंटाळा कसा येतच नाही

तसा मी ’बडबडय़ा’ आहे
पण एकटेपणा ’अबोल’ आहे
’मी’ तासनतास त्याच्याशी बोलतो
’तो’ मात्र वेडा, माझ्याशी बोलतच नाही

माझ्याच शब्दांचे ध्वनी, जेव्हा
लांब कुठेतरी आपटुन, प्रतिध्वनी
बनुन, एकटेपणा चिरत येतात
तेव्हा मीच ते एकांतात ऎकतो

माझी बडबड मात्र ’तो’ एकटक ऎकतो
त्याला कंटाळा कसा माहितच नाही
मग मीच कधी त्याच्यावर रुसतो
मित्रांच्या मैफलीत जाऊन बसतो

तिथ थोडावेळ गर्दित रमतो
पण तरी एकटाच असतो
सोबतीला परत एकटेपणा असतो

          सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.


Aug 14, 2010

स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


१५ आँगस्ट सगळ्यांना स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, भारतीय प्रजासत्ताक चिरायु होवो, वंदे मातरम्.


‎15 August, Happy Independence Day to everybody.Aug 10, 2010

हाला, प्याला, मधुशाला


टिप - खालिल काव्य हे श्री.हरिवंशराय बच्चन यांच्या ’मधुशाला’ याचे भाषांतर, रुपांतर, अथवा संस्करण नसुन......’मधुशाला’ पासुन प्रेरणा घेऊन/प्रेरित
होउन रचलेले माझे स्वरचित काव्य आहे. यातील अनेक कल्पना माझ्या स्वत:च्या आहेत, ज्या मधुशलेत ही आढळून येणार नाही.
श्री.हरिवंशराय बच्चन यांच्या ’मधुशाला’ याचा प्रभाव यावर आहे, हे मी मोकळेपणाने मान्य करतो. मला हे लिहिण्यास प्रेरित केल्याबद्दल
श्री.हरिवंशराय बच्चन व ’मधुशाला’ यांचे मनापासुन आभार व त्यांचे ऋणी राहुन वाचकांपुढे हे काव्य सादर करतो.
---------------------------------------------------------------------------
साकि    बनुन    कवि        येतो
घेऊन      कवितेची           हाला
अर्थरुपी      मधाळ       शब्दांनी
भरतो काठोकाठ मनाचा प्याला

रसिक   तुम्ही  रसपान   करता
होऊन    शब्दमुग्ध      कवितेचे
अशीच राहो ही शब्दरुपी    हाला
अशीच राहो ही रसिक मधुशाला (१)
---------------------------------------------
साकि    बनुन    शिक्षक 
वाटतात  ज्ञानरुपी  हाला
सगळे  विद्यार्थी ही   मग
भरतात प्रतिभेचा प्याला

पुण्यकर्म   हे  निरंतन....
असेच   चालु  राहु   दे.....
अशीच राहो ही  विद्यालये
अशीच राहो ही मधुशाला (२)
------------------------------------------------------------
स्वर्गातुन घेऊन आला
हा गंगारुपी हाला.......
जटाधारी शिव बनले
त्याचा पृथ्वीवरील प्याला

युगा युगांची पापे धुण्या.......
’भगिरत’ प्रयत्न केले..........
अशीच राहो ही पुण्यात्मा गंगा
अशीच राहो ही मधुशाला (३)
-------------------------------------------------------------
जीवन    एक     मधुशाला......
प्रत्येक   क्षण   साकि    बनुन
पाजतो    अनुभवांची      हाला
तरी रिकामाच...मनाचा प्याला

कितिही    प्यायले    तरी....
तृप्ति            नाही...............
अशीच अतृप्त ही जीवनगाथा
अशीच अतृप्त ही मधुशाला (४)
-------------------------------------------------
प्रेक्षित येतो........
साकि बनुन.........
पाजतो धर्मरुपी....
मदभरी हाला......

माणुसकी ही विसरतो
मग नशेत राहणारा
फुट पाडतात धर्म, पंथ
एकोपा वाढवते मधुशाला (५)
---------------------------------------------------------------------------
मानवी शरीर आहे....
हाडा-मांसाचा प्याला...
ज्यामधे वाहते निरंतन
लाल रक्तयुक्त हाला.....

धक्का लावू नकोस....
सांभाळुन हाताळ याला
नाहितर.........फुटेल हा
जीवनरसाचा प्याला......(६)
----------------------------------------------
समुद्रमंथनातून आला,
अमृत कुंभ अलबेला......
अन् जहरि विषाचा प्याला
काय करावे याचे?? 

कसे वाटावे........????
कळेच ना कोणाला.......??
पिण्यास हलाहल सत्वरी गेला,
धावुन जटाधारी मतवाला (७)
--------------------------------------------
मोहिनी रुपी विष्णू
साकि बनुन आला......
घेऊन आपल्या बरोबर,
वाटायला अमृत रुपी हाला

मोहजालात मोहिनीच्या
देव-दानव मोहरले......
अमर राहो ही अमृतहाला
अमर राहो ही मधुशाला (८)
---------------------------------------------------------------------
माझे शरीर आहे प्याला
ज्यात मी भरली......,
राष्ट्रभक्तिची हाला......
रोमरोमात भिनुदे माझ्या

प्रियेची ही ज्वाला......
अखंड, निर्व्याज, निरंतर,
चिरायु होवो ही भक्तिरस हाला
चिरायु होवो ही मधुशाला (९)
-------------------------------------------------------------------------------
दिवसभर श्रम करतो
पोटासाठी मतवाला
झिरपते शरिरातुन
घर्मरुपी हाला......

      जगाची रितच आहे,
      दिवसभर दमल्यावर
      रात्री आठवते........,
      श्रमपरिहारासाठी मधुशाला (१०)
---------------------------------------------------------------------------
उत्तरेस उभा हिमालय 
जणू हिमजडित प्याला
ज्यामधून निरंतन स्त्रवते
हिम जलरस हाला........

सुजलाम्,  सुफलम्    भूमीचे
नंदवन             फुलले...........
चिरकाल वाहो ही जीवन हाला
चिरकाल राहो ही    मधुशाला (११)
--------------------------------------------------------------------------------
सखे ये........घेऊन,
रत्नजडित कलश प्याला
ऒत नाजुकतेने.........
मधुरस हाला...........

हलकेच लावुन   ऒठांना
मादक    बनव       हाला
अशीच राहो ही मादकता
अशीच राहो ही मधुशाला (१२)
------------------------------------------------------------------------------
काळ रात्र सरली
साकि पहाट आली
घेऊन सुवर्ण कुंभ कलश
उजळित प्रकाश हाला

       पशु  -  पक्षि,        निसर्ग......
       डोले   मंत्रमुग्ध       लडिवाळा
       सदैव  प्रकाशमय  राहो  प्याला
       सदैव प्रकाशमय राहो मधुशाला (१३)
------------------------------------------------------------------------------
प्रार्थना करण्यास, हिंदू....
जातो देवळात........
मुसलमान मशिदीत, अन्
ख्क्रिस्ती गिरजाघरात.....

       वेगवेगळी देवालय   यांची
       वेगवेगळ्या धारणा....डोकी
       भडकावती   पंडित,   काजी, 
       पाद्रि, थंडकरती....मधुशाला (१४)
--------------------------------------------------------------------------------
एककल्ली उजाड आयुष्यात
स्त्री......साकि बनुन येते
घेऊन श्रुंगाराचा प्याला
तृप्त करण्या पाजते......,

        कामरुपी              हाला......
        कामरसात भिजून मोहरतो
        तरी  अतृप्त ही  कामवासना
           .......अतृप्त ही मधुशाला (१५)
----------------------------------------------------------------------------------
समोर रत्नजडित मधुप्याला
घेऊन उभी साकिबाला
नेत्रांनी पाजते मला
विभोर मादक हाला

          तुम्हीच   सांगा     मला??
          का.... फोडु   हा      प्याला
          का....सोडु  ही हाला, मला
          प्राणाहुन प्रिय   मधुशाला (१६)
------------------------------------------------------------
नियतिने फोडला दु:खाचा
कुंभ-कलश प्याला......
त्यातुन पाझरे निरंतन
वियोग-वेदनेची हाला

        दरिद्रि    असो  वा   श्रीमंत
        कुणास  चुकला  प्रतिपाला?
       स्थायी, शाश्वत वियोग-वेदना
       स्थायी,   शाश्वत     मधुशाला (१७)
--------------------------------------------------------------
सजली मैफल.......
सरसावुनी बैसले जन
करोनी कर्णांचा प्याला
गायकही मग हळुवार

        छेडे सुरस स्वर हाला
        अमोघ, सुमधुर, स्वर्गीय
       अशीच बहरो ही मैफल
        अशीच बहरो ही मधुशाला (१८)
-----------------------------------------------------------------------
ईश्वराने ठेवला आधांतरी
वसुंधरेचा हरित  प्याला
ऒतली    समुद्रजलरुपी
निळी   खारट  हाला

         रसपान  करण्या  रात्री
        येती   चंद्र - ग्रह - तारे
        युगोयुगांतर अशीच आहे
        अजेय - अमर मधुशाला (१९)
----------------------------------------------------------------------------
नाही नाही  सोडू    शकत
मादक   करवंदी    हाला
नाही नाही   फोडू  शकत
मोहक   मधुरस   प्याला

         नाही    विसरु     शकत
         रुपवान कमनिय साकिबाला
         स्वप्नातही   दिसे   मजला
         माझी   प्रियतम  मधुशाला (२०)
----------------------------------------------------------------
स्वर्गात  भरली   इंद्रसभा
उपस्थित  समस्त  देवता
रंभा,     उर्वशी,       मेनका
या  सजल्या  साकिबाला

          घेऊन सुवर्ण कलश-प्याला
          ऒतति   सोमरस   हाला
          आदि - अनादि,   पौराणिक
          स्वर्गीय   आहे  मधुशाला (२१)
----------------------------------------------------------------
खळ......खळ, बघ   फुटला
मातीचा सुबक, सुरख प्याला
छळ.....छळ, बघ   सांडली
अमीट, मादक करवंदि हाला

           बघ बघ साकिला राग आला
           कितीही अनावर संताप झाला
           तरी मायेने  जवळ   घेणार
           प्रेमळ,   वत्सल   मधुशाला (२२)
----------------------------------------------------------------
साकिकडे मागितला मी प्याला
तिने दिला सुवर्ण प्याला
साकिकडे मागितली मी हाला
तिने पाजली मादक हाला

           जे....जे साकिकडे मागितले
           ते......ते   मला   मिळाले
           कल्पवृक्ष, कामधेनू  सारखी
           इच्छापूर्ती करते  मधुशाला (२३)
----------------------------------------------------------------
कुठेच   नव्हता   प्याला
कुठेच   नव्हती    हाला
कुठेच   नव्हता   साकि
कुठेच  नव्हती मधुशाला 

           ऒतुन समाधानरस    हाला
           काठोकाठ भरा मनाचा प्याला
           बहिर्मुख होऊन  शोधण्यापेक्षा
           अंतर्मुख बनवते   मधुशाला (२४)
----------------------------------------------------------------
© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.