Dec 25, 2010

दिवस पहिला.

८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस पार पडला.
सगळ्या साहित्य संमेलनासारखेच वादाचे गालबोट ८४ व्या संमेलनालाही लागले.
दादोजी कोंडदेवांचे नाव बदलण्याची मागणी संभाजि ब्रिगेडने केली, नाहीतर संमेलन उधळून लावण्याची धमकी दिली.
पण आयोजकांनी असल्या धमकीला भीक न घालता, नाव बदल केला नाही, यासाठी ते (आयोजक) अभिनंदनास पात्र आहेत.

दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते का नव्हते हा एक वेगळा विषय/वाद आहे. पण ऎन संमेलनाच्या तोंडाशी नाव बदलण्याची मागणी करुन अयोजकांना व साहित्यप्रेमी जनतेला ब्लँकमेल करायची संधी साधुन संभाजि ब्रिगेडच्या गुंडांनी चांगलीच प्रसिद्धी प्रसारमाध्यमांनमध्ये मिळवली.पहिल्या दिवशी कविता वाचनाच्या कार्यक्रमाला हजर राहून मी ही साहित्याचे काही कण वेचायचा प्रयत्न केला. खुप आनंद वाटला, काही छान कविता ऎकायला पण मिळाल्या.
शिवाय पुस्तकांच्या प्रदर्शनात फिरुन घेतले. ठाणे/मुंबई/पुण्याच्या लोकांना पुस्तकांच्या प्रदर्शनाचे जास्त अप्रूप नाही, ती आम्ही बाराही महिने पाहतो. असो सांगायचा मुद्दा हा की साहित्याची गंगा, ठाण्यातील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माझ्या दारी आली आणि मीही तीत मनोसोक्त डुंबुन घेतले


रात्री ९ वा पोटात कावळ्यांचे संमेलन भरले, सगळे सुरेल आवाजात कविता वाचन करायला लागले. मलाही काही सुचत नव्हते. तेव्हा विचार केला, भाकरिचा प्रश्न सोडवायला हवा. नाहितरी काही कविंनी म्हंटलेच आहे, भाकरीचा  प्रश्न सोडवताना कविता सापडली/हरवली
८४ व्या संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनीही आपल्या भाषणात आधी जीवन (भाकरी) नंतर साहित्य (कविता) असचं काहितरी म्हंटल्याचे अंधुकसे आठवले आणि माझे पाय आपोआप घराकडे परतिच्या वाटेकडे वळले.

No comments:

Post a Comment