Dec 30, 2010

दिवस तिसरा


तिस-या दिवशी लवकरच निमंत्रित कवींच्या काव्यवाचनाला उपस्थित राहिलो. महाराष्ट्राच्या काना कोप-यातून आलेल्या कवींनी उत्कृष्ट काव्यवाचन केले. सामाजिक, राजकिय, विनोदी, गज़ल, हलक्या-फुलक्या अशा वेगवेगळ्या रचना सादर केल्या. 

हा कार्यक्रम संपल्यावर परत एकदा ’काव्यजागर’ मधे जाऊन ’काळ-वेळ’ ही आणखी एक कविता वाचली. तेथून आमच्या ’निल पुष्प साहित्य मंडळ, ठाणे’ च्या स्टाँल वर आमचे नविन प्रकाशित झालेले कवितासंग्रह ’काव्योत्सव-३’ (ज्याचे प्रकाशन साहित्य संमेलनात अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले, ज्यात माझ्या दोन कविता आहेत.) घेण्यासाठी गेलो.

तेथे मंडळाचे उपाध्यक्ष म्हणाले आलाच आहेस तर थोडा वेळ स्टाँलवर बस. मी पण विचार केला थॊडा वेळ थांबू. आमच्या नविन कवितासंग्रह ’काव्योत्सव-३’ वर भर देउन थोडा आक्रमक पवित्रा (Aggressive Sales Marketing) घेत संध्याकाळ पर्यंत चांगल्या पैकी व्यवसाय झाला. उपाध्यक्ष पण खुश झाले, दोन दिवस का आला नाहिस म्हणून विचारल. (दोन दिवस जर स्टाँलवर आलो असतो, तर चांगल्या कार्यक्रमांना मुकावे लागले असते, हे मनात) मी पण भलताच खुश होतो, अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनात दोन स्वरचित कविता वाचल्या, 
आमच्या निलपुष्प साहित्य मंडल, ठाणे च्या स्टाँलवर उभा राहुन आमचा नविन कवितासंग्रह व इतर पुस्तके विकली. अशा प्रकारे थोडयाफार प्रमाणात का होईना साहित्याची सेवा केली.

आशा रीतीने ठाण्यातील संमेलन यशस्वी केल्या बद्द्ल सगळ्याचे एक ठाणेकर म्हणून आभार.

No comments:

Post a Comment