Dec 31, 2010

Welcome 2011नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 


Happy New Year 


Welcome 2011

Dec 30, 2010

दिवस तिसरा


तिस-या दिवशी लवकरच निमंत्रित कवींच्या काव्यवाचनाला उपस्थित राहिलो. महाराष्ट्राच्या काना कोप-यातून आलेल्या कवींनी उत्कृष्ट काव्यवाचन केले. सामाजिक, राजकिय, विनोदी, गज़ल, हलक्या-फुलक्या अशा वेगवेगळ्या रचना सादर केल्या. 

हा कार्यक्रम संपल्यावर परत एकदा ’काव्यजागर’ मधे जाऊन ’काळ-वेळ’ ही आणखी एक कविता वाचली. तेथून आमच्या ’निल पुष्प साहित्य मंडळ, ठाणे’ च्या स्टाँल वर आमचे नविन प्रकाशित झालेले कवितासंग्रह ’काव्योत्सव-३’ (ज्याचे प्रकाशन साहित्य संमेलनात अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले, ज्यात माझ्या दोन कविता आहेत.) घेण्यासाठी गेलो.

तेथे मंडळाचे उपाध्यक्ष म्हणाले आलाच आहेस तर थोडा वेळ स्टाँलवर बस. मी पण विचार केला थॊडा वेळ थांबू. आमच्या नविन कवितासंग्रह ’काव्योत्सव-३’ वर भर देउन थोडा आक्रमक पवित्रा (Aggressive Sales Marketing) घेत संध्याकाळ पर्यंत चांगल्या पैकी व्यवसाय झाला. उपाध्यक्ष पण खुश झाले, दोन दिवस का आला नाहिस म्हणून विचारल. (दोन दिवस जर स्टाँलवर आलो असतो, तर चांगल्या कार्यक्रमांना मुकावे लागले असते, हे मनात) मी पण भलताच खुश होतो, अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनात दोन स्वरचित कविता वाचल्या, 
आमच्या निलपुष्प साहित्य मंडल, ठाणे च्या स्टाँलवर उभा राहुन आमचा नविन कवितासंग्रह व इतर पुस्तके विकली. अशा प्रकारे थोडयाफार प्रमाणात का होईना साहित्याची सेवा केली.

आशा रीतीने ठाण्यातील संमेलन यशस्वी केल्या बद्द्ल सगळ्याचे एक ठाणेकर म्हणून आभार.

दिवस दुसरा.दुस-या व तिस-या दिवसाचा गोषवारा लिहायला अंमळ उशिरचं झाला, त्यास साहित्य संमेलनाचा हँगऒव्हर कारणीभूत आहे. ते साहित्यिक वातावरण, रसिक वाचकांची उपस्थिती, संमेलनात ऎकलेल्या एकसे एक चांगल्या कविता मनातून व डोक्यातून जातच नव्हत्या. साहित्याचा हँगऒव्हर कसा असतो, व तो किति काळ राहू शकतो याचा अनुभव मला ठाण्याच्या ८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनात आला.

संमेलन काळात (खर म्हणजे आधी पासुनच) ठाणे शहर साहित्यमय झाले होते, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, मोठमोठ्या साहित्यिकांची उपस्थिती वातावरणात भर घालत होती. ठाणेकरांच्या हे पथ्यावरच पडले, व त्यांनी संमेलनाला उदंड प्रतिसाद दिला. तसेच अनेक रसिकांनी महाराष्ट्राच्या काना कोप-यातून येऊन ठाणेकरांना आदरतिथ्याची संधी दिली.

दुस-या दिवशी मी तसा आनंदीच होतो, नवकवींसाठीचा कविता वाचनाचा कार्यक्रम ’काव्यजागर’ होता. नवकवींसाठी असलेल्या ’लोकशाहिर विठ्ठल उमप’ व्यासपिठावर मी माझी ’वेदनेची संवेदना’ ही कविता ऎकविली. संमेलनात कविता ऎकवायला मिळाली या भावनेनेच ऊर भरुन आल, कृतकृत्य झाल्या सारख वाटल. आणखी एखादी कविता वाचायला मिळेल तर बर होईल असा मनात विचार आला. पण तिस-या दिवशी निमंत्रित कवींचे काव्यवाचन होते, म्हणून लवकर निघालो, जास्त जागत बसलो नाही.Dec 25, 2010

दिवस पहिला.

८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस पार पडला.
सगळ्या साहित्य संमेलनासारखेच वादाचे गालबोट ८४ व्या संमेलनालाही लागले.
दादोजी कोंडदेवांचे नाव बदलण्याची मागणी संभाजि ब्रिगेडने केली, नाहीतर संमेलन उधळून लावण्याची धमकी दिली.
पण आयोजकांनी असल्या धमकीला भीक न घालता, नाव बदल केला नाही, यासाठी ते (आयोजक) अभिनंदनास पात्र आहेत.

दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते का नव्हते हा एक वेगळा विषय/वाद आहे. पण ऎन संमेलनाच्या तोंडाशी नाव बदलण्याची मागणी करुन अयोजकांना व साहित्यप्रेमी जनतेला ब्लँकमेल करायची संधी साधुन संभाजि ब्रिगेडच्या गुंडांनी चांगलीच प्रसिद्धी प्रसारमाध्यमांनमध्ये मिळवली.पहिल्या दिवशी कविता वाचनाच्या कार्यक्रमाला हजर राहून मी ही साहित्याचे काही कण वेचायचा प्रयत्न केला. खुप आनंद वाटला, काही छान कविता ऎकायला पण मिळाल्या.
शिवाय पुस्तकांच्या प्रदर्शनात फिरुन घेतले. ठाणे/मुंबई/पुण्याच्या लोकांना पुस्तकांच्या प्रदर्शनाचे जास्त अप्रूप नाही, ती आम्ही बाराही महिने पाहतो. असो सांगायचा मुद्दा हा की साहित्याची गंगा, ठाण्यातील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माझ्या दारी आली आणि मीही तीत मनोसोक्त डुंबुन घेतले


रात्री ९ वा पोटात कावळ्यांचे संमेलन भरले, सगळे सुरेल आवाजात कविता वाचन करायला लागले. मलाही काही सुचत नव्हते. तेव्हा विचार केला, भाकरिचा प्रश्न सोडवायला हवा. नाहितरी काही कविंनी म्हंटलेच आहे, भाकरीचा  प्रश्न सोडवताना कविता सापडली/हरवली
८४ व्या संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनीही आपल्या भाषणात आधी जीवन (भाकरी) नंतर साहित्य (कविता) असचं काहितरी म्हंटल्याचे अंधुकसे आठवले आणि माझे पाय आपोआप घराकडे परतिच्या वाटेकडे वळले.

Dec 10, 2010

८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन ठाणे.


८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे होणार आहे, तुम्ही त्याला हजर राहणार ना?

एक ठाणेकर या नात्याने मी तुम्हाला मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण देतो.....

८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनाला (ठाणे) यायचहं......