Dec 30, 2010

दिवस दुसरा.



दुस-या व तिस-या दिवसाचा गोषवारा लिहायला अंमळ उशिरचं झाला, त्यास साहित्य संमेलनाचा हँगऒव्हर कारणीभूत आहे. ते साहित्यिक वातावरण, रसिक वाचकांची उपस्थिती, संमेलनात ऎकलेल्या एकसे एक चांगल्या कविता मनातून व डोक्यातून जातच नव्हत्या. साहित्याचा हँगऒव्हर कसा असतो, व तो किति काळ राहू शकतो याचा अनुभव मला ठाण्याच्या ८४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनात आला.

संमेलन काळात (खर म्हणजे आधी पासुनच) ठाणे शहर साहित्यमय झाले होते, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, मोठमोठ्या साहित्यिकांची उपस्थिती वातावरणात भर घालत होती. ठाणेकरांच्या हे पथ्यावरच पडले, व त्यांनी संमेलनाला उदंड प्रतिसाद दिला. तसेच अनेक रसिकांनी महाराष्ट्राच्या काना कोप-यातून येऊन ठाणेकरांना आदरतिथ्याची संधी दिली.

दुस-या दिवशी मी तसा आनंदीच होतो, नवकवींसाठीचा कविता वाचनाचा कार्यक्रम ’काव्यजागर’ होता. नवकवींसाठी असलेल्या ’लोकशाहिर विठ्ठल उमप’ व्यासपिठावर मी माझी ’वेदनेची संवेदना’ ही कविता ऎकविली. संमेलनात कविता ऎकवायला मिळाली या भावनेनेच ऊर भरुन आल, कृतकृत्य झाल्या सारख वाटल. आणखी एखादी कविता वाचायला मिळेल तर बर होईल असा मनात विचार आला. पण तिस-या दिवशी निमंत्रित कवींचे काव्यवाचन होते, म्हणून लवकर निघालो, जास्त जागत बसलो नाही.



No comments:

Post a Comment