Jul 26, 2010

स्वपनांना छाटले??


दु:ख-वेदना का विषम वाटले?
आभाळ डोईवरचे का मधेच फाटले?

आताच कुठे घेतला मोकळा श्वास
संकटांचे मोहोळ का एकदम दाटले?

रम्य, सुंदर, नव सकाळ असता
विषण्ण् भावनांनी का उर कोंदटले?

काय असा झाला हातुन गुन्हा
निष्ठुरपणे असे का स्वपनांना छाटले?

जीवन शलाका कधीतरी विझणार असता
उभे आयुष्य का मरत काटले?

-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

घात केला.दैंवाने कठोर आघात केला
प्रेयसिने प्रेमात घात केला

मानुन आपले सर्वस्व अर्पिले
तिने सर्वस्व लुटुन घात केला

शब्दांवर, वचनांवर भाळुन प्रित केली
शब्दांना फिरवुन, वचनांना मोडुन घात केला


गाभा-यात ह्र्दयाच्या प्राणप्रतिष्ठा केली
तिने ह्र्दयमंदिर तोडुन घात केला

डोळ्यांचे ईशारे, नजरेचे बहाणे
नजर फिरवुन  घात केला

मखमली केसांच्या सावलीत झोपलो
तिने केसाने गळा कापुन घात केला


-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

गुरुदक्षिणा


गुरुदक्षिणेचा हल्ली रिवाज नाही
एवढा आज्ञाकारी कोणी एकलव्य नाही

मिळतात कोठे अर्जुन अन् एकलव्य
अंगठा मांगण्याचा हल्ली प्रघात नाही

(सुरेश) भटांना गुरु मानतो मी, पण
ग़ज़ल चोरण्याचा माझा स्वभाव नाही

विद्यापीठांना एकदम उधाण आले....
विद्या....दान आहे, व्यवसाय नाही

-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

अस्वस्थ अश्वथामाअंतरिच्या जखमांना लपविले कितिदा

घाव तुझे ह्र्दयावर झेलले कितिदानकार तुझा मस्तकावर घेऊन, मी

ऊध्वस्त अश्वथामा भटकलो कितिदासंपला विश्वास जगण्यावर आता

नकारात होता रुकार वाटले कितिदाअवस्थेस माझ्या जबाबदार कोण??

पुसले अनेक प्रश्न मजला कितिदानाव तुझे ह्र्दयावर कोरले होते

ऒठांवर येऊ दिले नाहि कितिदाआयुष्यात पुन्हा वसंत अनुभवलाच नाही

अनेक श्रावण येऊन,बरसुन गेले कितिदाजगी सर्व दु:खी मीच आहे वाटले

’पर दु:ख शीतल’ ऎकले कितिदामाफ करुन विसरायचे म्हंटले, तरि

सुड घ्यावा असे वाटले कितिदाघराकडे तुझ्या वळणार नाही बोललो

पाऊले फिरुन तेथे परतति कितिदाह्र्दयात प्रेमांकुर नंतर फुललाच नाही

सुंदर चेहरे जरि पाहिले कितिदा
      -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.