Jul 26, 2010

गुरुदक्षिणा


गुरुदक्षिणेचा हल्ली रिवाज नाही
एवढा आज्ञाकारी कोणी एकलव्य नाही

मिळतात कोठे अर्जुन अन् एकलव्य
अंगठा मांगण्याचा हल्ली प्रघात नाही

(सुरेश) भटांना गुरु मानतो मी, पण
ग़ज़ल चोरण्याचा माझा स्वभाव नाही

विद्यापीठांना एकदम उधाण आले....
विद्या....दान आहे, व्यवसाय नाही

-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

2 comments:

 1. Can you elaborate on your following lines: (सुरेश) भटांना गुरु मानतो मी, पण
  ग़ज़ल चोरण्याचा माझा स्वभाव नाही

  ReplyDelete
 2. सुहासजी नमस्कार, मला नम्रपणे वाटतेकी प्रत्येक वाचक त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्वाच्या गडणघडणीप्रमाणॆ, मतांप्रमाणे कुठल्याही गोष्टींचे अर्थ लावत असतो. आणि कविने आपल्या रचनेबद्दल स्पष्टिकरण देऊ नये, वाचकांनी आपापल्या कुवतीनुसार अर्थ घ्यावा.
  मला वाटते त्या ऒळी self- explanatory आहेत, हे मी नम्रपणे नमुद करु इच्छितो.
  राग नसावा, लोभ असावा ही विनंति

  ReplyDelete