Jun 10, 2010

कविता



कविता कवीच स्वप्न 

निर्मितीचा ध्यास, 

कवीचा श्वास

भास-आभास, 

जगण्यावरचा विश्वास

भावनांवर घातलेला साज

कवीचा माज, 

तिचा वेगळाच बाज

शब्दांचा खेळ, 

प्रतिभेचा मेळ

कवीचा हुंकार, 

अनुभवांची शिजोरी

कविचा आनंद, परमानंद, 

स्वानंद...................

कवीच्या प्रतिभेचा उदय आणि अस्त

त्यांच्यामधला संधिप्रकाश

कवीचा छंद 

कवी-रसिकांमधला अनुबंध

ॠणानुबंध.............

कवीच स्वातंत्र

समाजावर ऒढलेला आसुड, 

एक क्रांती

कविता एक विचार 

कवीचा आचार 

कविता अजोड, 

थोडी विजोड 

आवडली तर मनापासुन दाद द्या

अथवा टिका करा.



 -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)




© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

कुणाचे????


लागले ह्रदयास हे चित्त कुणाचे 
जाहले तुटण्यास हे निमित्त कुणाचे?

रोकडा सवाल आमचा थोर पुढा-यांना
ऎकुन खवळले हे पित्त कुणाचे?

वेडा प्रयास माझा गज़ल रचनेचा
कळलेच ना कधी हे वृत्त कुणाचे?

जीवावर ज्याच्या निवडुन रोज येती
लोकांवर उलटले हे उम्मंत्त कुणाचे?

सत्तेच्या पंढरिला निघाली खादाडांची वारी
स्वीस बँकेत पडलेले हे वित्त कुणाचे?

                    -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)



© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.

Jun 7, 2010

2010 FIFA WC @ South Africa.


03 Days 10Hrs 25Mins to go for this.


Official logo of FIFA WC @ South Africa


Official logo of Mascot 



The Prestigious FIFA trophy, 32 National teams will fought for this.


Official  theme song of 2010 WC @ South Africa.


K'naan - Wavin' Flag [South Africa 2010 Official Theme Song]