माझ्या बद्दल थोडेसेमी स्वत:बद्दल काय लिहिणार. मी कविता करतो हे मला हल्लीच उमगल. शाळेत असताना मराठी, मराठी कविता फार आवडायच्या असा काही प्रकार नव्हता. परीक्षॆपुरता त्यांचा अभ्यास करायचो. नंतर मात्र एकूणच गज़ल, कवितां विषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकि निर्माण झाली. पहिले इतरांच्या गज़ल, कविता पाठ करायचो आणि ऎकवायचो, तो एक छंद्च जडला. नंतर अपघातानेच कविता करायला लागलो.


त्याचे झाले असे, की अचानक माझ्या वडिलांना ICU मध्ये ठेवावे लागले. अशावेळी मी रात्री हाँस्पिटालमधे होतो, व वडिल ICU त Unconscious होते. अचानकपणे मनात विचारांची गर्दी झाली, वेगवेगळ्या प्रकारचे विचार. तेव्हा सहजच मनात आले की हे कागदावर उतरुन घेऊ. जवळ पेन, कागद काहिच नव्हत. पेन एका जवळच बसलेल्या दुस-या एका पेशंटच्या नातेवाईकाकडून घेतले, आणि  तेथेच पडलेल्या हाँस्पिटालच्या बिलावर ते विचार लिहून काढले. अशा रितीने पहिल्या कवितेचा (खरे म्हणजे  पहिल्या दोन कवितांचा) जन्म झाला. नंतर त्या हाँस्पिटालमधे आणखी ब-याच कविता लिहिल्या.

काव्य निर्मितीचा आनंद काय हे अनुभवले, ती धुंदी, ती नशा.......अवर्णनिय आहे

त्यामूळे प्रतिभा ही खरच परमेश्वरी देणगी आहे, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. अशावेळी सरदार जाफ़रींचा एक शेर आठवतो.


ये तो हैं चंदही जल्वे जो झलक आये है,
रंग है और मेरे दिल के गुलिस्ताँमें अभी!
मेरे आग़ोशे तख़य्युलमें हैं लाख़ॊ सुभहें’
आफ़ताब और भी हैं मेरे गिरेबाँमें मे अभी!!
- सरदार जाफ़री

अर्थ - [माझ्या (प्रतिभारुपी) उद्यानातल्या काही थोडया रंगांचेच दर्शन अद्याप तुम्हाला झालंय. अजुन कितीतरी रंग तुम्ही पाहायचे बाकी आहेत.  माझ्या विचारांच्या (कल्पनांच्या) कुशीत असंख्य प्रभातकिरण दडून राहिले आहेत आणि माझ्या ह्यदयाच्या (छातीवरील वस्त्राआड) आणखीही  कितीतरी सूर्य प्रकट होण्याची वाट पाहत थांबून राहिले आहेत.]

- धन्यवाद