Sep 9, 2010

आलिंगन


तोडुन सारे बंधन
तुझे-माझे व्हावे मिलन

हातांत तुझे हात
घ्यावे दिर्घ हस्तालोंदन

मना मनात गुंफुन
जावे निरंतर आंदोलन

ऒठांवरती ऒठ ठेवूनी
घ्यावे प्रदिर्घ चुंबन

तुला भिडावे, विरघळावे
घ्यावे कवेत आलिंगन

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)No comments:

Post a Comment