Aug 31, 2010

डाँक्टर आणि कवी



काही योग अजोड असतात
थोडेसे विजोड असतात
आता हेच बघाना

मी स्वप्निल, रोमँटिक, कवी मनाचा
र्दुदैवाने आजारी पडलो, अन्.........
सुदैवाने हीच्याशी ऒळख झाली

ही डाँक्टर, हुशार, अभ्यासू.......
म्हणतात ना प्रेम आंधळ असत
दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो

ती नेहमी मेरिट लिस्ट मधे
मी नेहमी ब्लँक लिस्ट मधे......
ती सदैव फस्ट बेंच वर
मी सदैव काँलेज कँटिन मधे
मी काव्यात बोलणारा
ती साईंटिफिक बोलणारी

ती यायला उशीर झाला की
मी म्हणतो, ’जीवाची घालमेल होते’.
ती म्हणते, ’थांब ब्लड प्रेशर चेक करते

खुप वेळाने ती दिसली की, मी म्हणतो
’ह्र्दयास गुदगुल्या होतात, जीव भांडयात पडतो’
ती लगेच माझी पल्स चेक करते..........

मी रोमँटिक मूडमधे असलो की म्हणतो, 
तुझ्या प्रेमात मी वेडा-पिसा झालोय....
ही जमिन फिरते, आकाश गरगरते.....
ती लगेच म्हणते, ’चल शुगर चेक करुया’.

अशी आमची जोडी थोडी विजोड आहे
पण खरच अजोड आहे..........

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)



© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserve








1 comment: