Aug 21, 2010

रोज एक कविता लिही.

रोज एक कविता लिही
मन मला सांगत होतं
जर तुला (महा)कवी व्हायच असेल
तर रोज एक कविता लिही

काही गद्यात लिहितात
काही पद्यात लिहितात
काही चारोळ्या पाडतात
काही आरोळ्या ठोकतात
काही गज़लेत रमतात
काही बखरित रटतात

कशाही प्रकारात लिही
रोज एक कविता लिही

खेळातल्या राजकारणावर लिही
राजकारणातल्या खेळावर लिही
शोषितांवर, शोषणावर लिही
भुकेलेल्यांवर, पोट भरलेल्यांवर लिही
आईवर-बाईवर, बापावर-सापावर लिही
माक्स-ऎंगल्सवर, स्टँलिन-लेनिनवर लिही
तू फक्त लिही, लोक असेच महाकवी होतात

मेलेल्या ऊंदरावर, मारत्या बैलावर, शहामृगावर
सारस्वतांवर लिही, विद्रोह्यांवर लिही
स्तनांवर-जनांवर, कापडावर-पापडावर लिही


कशावरही लिही पण लिही, पण    
तू लिही रोज एक कविता लिही

जर तुला (महा)कवी व्हायच असेल
तर रोज एक कविता लिही........

           -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.



1 comment: