Aug 18, 2010

एकटा


मी जेव्हा एकटा असतो
तेव्हा खरच चांगला असतो
तस म्हणायला ’एकटा असतो’
पण तसा एकटेपणा सोबत असतो

तो माझी पाठच सोडत नाही
सुखात, जास्त करुन दु:खात
माझ्या सोबतीला असतो
त्याचा मला, मला त्याचा
कंटाळा कसा येतच नाही

तसा मी ’बडबडय़ा’ आहे
पण एकटेपणा ’अबोल’ आहे
’मी’ तासनतास त्याच्याशी बोलतो
’तो’ मात्र वेडा, माझ्याशी बोलतच नाही

माझ्याच शब्दांचे ध्वनी, जेव्हा
लांब कुठेतरी आपटुन, प्रतिध्वनी
बनुन, एकटेपणा चिरत येतात
तेव्हा मीच ते एकांतात ऎकतो

माझी बडबड मात्र ’तो’ एकटक ऎकतो
त्याला कंटाळा कसा माहितच नाही
मग मीच कधी त्याच्यावर रुसतो
मित्रांच्या मैफलीत जाऊन बसतो

तिथ थोडावेळ गर्दित रमतो
पण तरी एकटाच असतो
सोबतीला परत एकटेपणा असतो

          सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)




© Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.


No comments:

Post a Comment