Feb 28, 2010

गोष्ट एका जिद्दी ब्रँडची (Front of the Class)

http://en.wikipedia.org/wiki/Tourette_syndromehttp://en.wikipedia.org/wiki/Front_of_the_Class

परवा असाच टी.व्ही वर चँनल बदलत बसलो होतो. सहजचं HBO  ला थोडा वेळ थांबलो, जरा बरा चित्रपट वाटला म्हुणून बघत बसलॊ. चित्रपटाचे नाव ’Front of the Clas’ , ही एका अशा मुलाची सत्यकथा आहे ज्याला टोरेट नावाचा (Tourette syndrome = Neurological disorder characterized by facial grimaces and tics and movements of the upper body and grunts and shouts and coprolalia) आजार असतो. शास्त्रिय भाषेत सांगायचे तर मेंदूकडुन मिळणारया संवेदना आणि त्यांचा प्रतिसाद याच्यात गफ़लत असते, व प्रतिसाद त्यांच्या नियंत्रणात नसतो. जसे काही जणांना डोळे मिचकवायची सवय असते, काही मानेला झटके देतात, विचित्र आवाज काढतात. चित्रपटा च्या नायकाचे नाव आहे ब्रँड कोहेन, काही मानसिक तणावामूळे वयाच्या ६ व्या वर्षा पासुन त्याला हा विकार होतो, व त्यामुळे तो बोलताना विचित्र आवाज (बदकासारखा) काढतो, व मानेला झटके देतो; त्यामुळे त्याला त्रास होतो , व शाळा सोडावी लागते. ब्रँडचे त्याच्या आई- वडिलां बरोबरचे नात्यावर याचा काय परिणाम हो तो ते दाखवले आहे. नविन शाळेत काय परिस्थिती असते ब्रँड त्यावर कशी मात करतो हे बघताना मजा येते.

चित्रपट मधे मधे फ़्लेशबँक होतो, व आपल्याला कळते की ब्रँडचे बालपण कसे गेले. ब्रँड मोठा झालाय़ व त्याला शिक्षक व्हायचाय, पण त्याचा आजार एक मोठा अडथळा आहे, त्यासाठी तो अनेक शाळांनमध्ये
साक्षतकारासाठी (interview) जातो, पण सगळी कडे नकार मिळतो, तो त्यावर सकारात्मक पध्यतिने कशी मात करतो हे बघताना मजा येते. शेवटी त्याला एका शाळेत २ री च्या विद्यार्थांना शिकवायची संधी मिळते, तेथील अनुभव, ब्रँडचे त्याच्या विद्यार्थां बरोबरचे प्रसंग बघताना हसुन हसुन पुरे वाट लागते, पण कुठे तरी ब्रँड बद्द्ल सहानभुती सुध्धा वाटते.
ब्रँड मैत्रिणी बरोबर डेटला गेल्यावर काय होते त्यासाठी चित्रपटचं पाहायला हवा. शाळेतील विद्यार्थांन बरोबरचे संवाद आणि त्यांच्यातील भावपूर्ण संबंध खुप भावनाप्रधान आहेत व आपल्याला खुप भावनिक बनवतात.

शाळेतील एक विद्यार्थांनीला कँसर झालेला असतो, जेव्हा तिचे निधन होते, व चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जायला ब्रँड त्याच्या टोरेट मुळे तयार नसतो. पण विद्यार्थांनीची आई समजुत घालते की ब्रँड तीचा आवडता शिक्षक होता, व त्याला यायलाच पाहीजे. तेव्हा ब्रँड नायलाजाने चर्चमधे जातो. हा प्रसंग अत्यंत  करुण , आणि ह्यदय द्रावक आहे, बघताना डोळे पाणावतात व गहिवरुन येते.
बर सगळचं सांगत नाही
ब्रँडला आपल्या आजारावर मात कशी करतो, हे अत्यंत स्फुर्ती दायक आहे, संकटांनी खचून न जाता त्याच्यावर मात करणारा ब्रँड आपल्याला बरचं काही शिकवतो.

तर जरुर हा चित्रपट बघा, आणि मनमुराद हसा.


वरती विकेपिडीयाच्या ब्रँड कोहेन व टोरेट सिंड्रोमच्या (Tourette syndrome)  लिंक दिल्या आहेत त्या जरुर पाहाव्या.


मला खुप आश्च्र्यर्य वाटताय की फेब्रुवारी या एका महिन्यात मी ११ ब्लोग कसे काय लिहिले..........जाउदेSSSSS

 होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा....... नमस्कार

No comments:

Post a Comment