Feb 17, 2010

व्यक्तीस्वातंतत्राची ऎशी-तॆशी

मित्रहो तुम्हाला माझी आणखी एक मराठी कविता सादर करत आहे, क्रुपया वाचावी

छंद : मुक्तछंदकधी कधी वाटत महाराश्टाला झालायतरी काय??

हुकुमशाही तर नाही ना इथे??

हिट्लर आणि मुसोलिनीची पिल्लावळ, वळवळते आहे

पाळलेल्या गुंडांची मिजास, मुजोरी, हतबल जनतेसमोरील दादागीरी

लोकशाहीच्या नावाखाली चाललेला हा हा हीडिस नंगा नाचं

अरे लोकशाही कशाशी खातात हे तरी माहीत्ये का तुम्हाला??

यांचे आदेश, यांचे हुकुम; पाळले की लोकशाही, जनादेश

आणि कोणी यांच्या विरोधात ब्र जरी काढला तर, ते देशद्रोही

मग परत आंदोलन, हाणामारी, तोड-फोड

यांचे काय ते व्यक्तीस्वातंत्र, आणि इतरांचे काय??

इतरांनी काय करायचे, कसे वागायचे, सगळे हे ठरवणार

आणि सरकार मजेत, ढिम्मं; जाऊ देना....

सुंठी वाचून खोकला जातोय ना मग......आपण सत्तेचे लोणी खाऊ

अरे याच्यासाठी दिला का स्वातंत्राचा लढा,

यासाठी केले का स्वातंत्रवीरांनी सर्वस्वाचा त्याग, बलिदान

ज्यांनी देशासाठी प्राण दिले, ते राहिल्येत जयंत्या, पुण्यतिथ्यांन पुरते

आणि त्यांचे फोटो आहेत सगळ्या सरकारी कचेरयांत........

हे असचं सगळ लोकशाहीत होणार असेल तर.......

भारतिय लोकशाहीच्या नावाने चांगभलं

-सौरभ (Sourabh)


1 comment: