Feb 27, 2010

मायमराठी.....अम्रुतातही पैजा जिंके

२७ फ़ेब्रुवारी, कवीश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ़ "कुसुमाग्रज" यांचा जन्मदिन,  मराठी भाषा दिन म्हणुन साजरा करतो. तसा सरकारी आदेश आहे.
असो द्यानेश्वरांनी म्हंटल्याप्रमाणे अम्रुतातही पैजा जिंकणारी आपली ही मायबोली आहे. जगभर जवळजवळ ९ करोड पेक्षा जास्त लोकांन कडून  बोलली जाते.
पण हल्ली आपण नेहमी ऎकतॊ की मराठीचे भविष्य काय?, मराठी भाषा मरायला टेकली आहे. कारण चहु बाजुनी होणारे हिंदी आणि इंग्रजीचे आक्रमण ती थोपवू शकत नाही.
मराठी लोकांनाच मराठीतून बोलायला लाज वाटते, न्युनगड वाटतॊ. दोन मराठी हमखास हिंदीतून बोलतात, त्यांचे हिंदी ही दिव्य असते हा भाग सोड्ला तर ’माय मरो आणि
मावशी जगो हीच आपली मानसिकता आहॆ. त्यातच हल्ली सगळ्यांची मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात आणि घरी ही इंग्रजीतूनचं बोलतात.
हिंदी आणि इंग्रजी ला विरोध असण्याचे कारण नाही, पण महाराष्ट्रात मराठीतून बोलायला पाहिजे, हे करणे प्रत्येक मराठी प्रेमी जनतेचे र्कतव्य आहे.
चार चौघात मराठीतून बोलायला पाहीजे, प्रथम जड जाइल पण न लाजता, न घाबरता चिकाटीने ते केले पाहीजे.
गुजराथी, तेलगू, हींदी, कन्नड भाषिक ज्या प्रमाणे फ़क्त त्यांच्याच भाषेतून न लाजता संवाद साधतात, असे करायला आपण ही शिकले पाहिजे.
असे करणे म्हणजे इतर भाषांचा तिरस्कार नव्हे, तर मात्रूभाषेवरील प्रेम आहे, व तीच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे व असे करण्याने मराठी भाषा जगेल, वाढेल.
तीच्या विस्तारास आपण सर्व कटिबध्द्द आहोत.
तर जागतिक मराठी दिनाच्या सर्व मराठी भाषिकांना हार्दिक शुभेच्छा मराठीत बोला. लाजु नका; कारण अम्रुतातही पैजा जिंकणारी आपली ही मायबोली आहे, त्याचा सार्थ
अभिमान बाळगा.


खाली सुरेश भट यांच्या मायबोली या कवितेतिल काही ओळी उद्रुत करत आहे.


लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी,
एवध्या जगात माय मानतो मराठी.

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते आमुच्या
आमुच्या उराउरात स्पंद्ते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक ’खेळ’ पाह्ते मराठी
शेवटी मदांध तख्य फोडते मराठी
                 -सुरेश भट

No comments:

Post a Comment