Mar 3, 2010

मनोगत



जीवन हे विरोधाभासांनी भरले आहे, नव्हे जीवन म्हणजेचं विरोधाभास. प्रत्येक पावलागणिक आपल्याला त्याची प्रतिची येते. मलाही आली.

माझ्या प्रतिभेला अशा नाजुक वेळी धुमारे फ़ुटले की, मझ्याचं आश्चर्याला पारावार राहीला नाही.
(माझ्या) प्रतिभेचे अत्युच्च आणि उत्कट प्रदर्शन अथवा माझ्या जीवनातील परमोच्च क्षण वगैरे वर्णन मी करणार नाही. पण माझ्या प्रतिभेचा हा साक्षत्कार माझ्यासाठी तरी सुखद धक्का आहे.


त्याच्या दर्जा बद्दल मी काही बोलणार नाही, नव्हे  ते संयुक्तिक ही होणार नाही. ते काम इतरांनी करावे. मला फ़क्त भावनांना वाट मोकळी करुन द्यायची होती, व तेच मी केले. ज्याप्रमाणे प्रत्येक आईला तीचे मुल अत्यंत प्रिय असते, मग ते कसेही क असेना  ते तिच्यासाठी अत्यंत सुंदर असते. तशीच काहीशी भावना आहे.


बरेच दिवस झाले, मी हल्ली ’सालसा’(salsa dance) क्लासला गेलो नाही. एरवी मी ’सालसा’ न्रुत्याद्वारे स्वत: ला व्यक्त करत होतो. बहुदा तो मार्ग/ माध्यमाचा वापर बंद झाला म्हणुन माझ्यातील प्रतिभेने दुसरया माध्यमाचा वापर करुन स्वत: ला (प्रतिभेला) व्यक्त केले. उदा लेखन, कविता, अभिनय इ. माध्यम कुठलेही असो प्रत्येक व्यक्तीने स्वत: ला व्यक्त केले पाहीजे. कारण आपण शेवटी माणस आहो, जेथे निसर्गातील प्रत्येक गोष्ट स्वत: ला व्यक्त करते, तिथे आपण तरी का मागे रहा. तर मग चला स्वत: ला व्यक्त करुया निडरपणे, निर्भिडपणे कुणाची तमा न बाळगता, कोण काय म्हणेल, काय बोलेल याचा विचार न करता...........व्यक्त होउया.......भावनांना मोकळी वाट देऊ या.......

खाली एक स्वरचित कविता देत आहे.
छंद : मुक्तछंद




कधी कधी वाटतं
जोर जोरात ओरडाव
पण माझा आवाज
पोहोचतचं नाही
या भिंतींन पलिकडे
या अभेद्य भिंती
आपणचं उभारलेल्या
एकमेकांन विरुद्ध
उच्च-नीच, गरीब- श्रीमंत
जाती पातीच्या भिंती
आत्ताच नाही
फार पूर्वी पासुन
म्हणुनच एवढया 
अभेद्य आहेत
मनात आणल तरी
नाही तोडू शकत
आणि नाही त्या
ओलांडू शकत
पण जर सगळ्यांनी
ठरवल तर नक्कीच
उन्मळुन पडतील त्या
पण हे जमेपर्यंत 
का नाही खिडक्या करुया
या भिंतीं  मध्येच

- सौरभ



No comments:

Post a Comment