Mar 19, 2010

वे द ने ची संवेदना (एक गज़ल)


जीवन म्हणजे सुख-दु:ख यांचा मिलाफ, पण नीट बघता  असे आढळून येते की सुखापेक्ष दु:खाचे प्रमाण अधिक असते. सामान्यजन सुख चांगले आणि दु:ख वाईट अशी सर्वसाधारण वर्गवारी करतात. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे चांगले/वाईट असे वर्गिकरण केले की मग सगळेच संदर्भ बदलतात.
अनेक जणांना दु:खाचे आघात पचवता न आल्याने ते जीवन संपवण्याचा दुदैवी निर्णय घेतात.
तसे बघितले तर दु:ख अत्यंत जरुरीचे आहे. आश्चर्य वाटताय ना?? पण कल्पना करा की जगातील दु:खचं नाहीसे झाले, तर आपणास सुखाचे/आनंदाचे महत्वचं कळणार नाही. दु:ख आहे म्हणून सुख आहे. उलट  दु:खामूळे सुखाचे महत्व वाढले आहे.
दु:खामुळेच अनेक कलाकारांच्या हातून श्रेष्ठ कलाक्रुति तयार झाल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आग्राचा ’ताजमहाल’. शहाजहानला मुमताजमहल हीचा विरह सहन न झाल्यामुळे, तिच्या चिरंतन स्म्रुतीसाठी जे स्मारक बांधण्यात आले ते म्हणजे ’ताजमहाल’.
अनेक कवींनी, शायरांनी दु:ख, दर्द, वेदना यांच्यावर असंख्य रचना केल्या आणि अमर झाले.
वानगी दाखल एक  उदाहरण देत आहे.

हमपे दु:खके पर्बत टुटे तो हमने शेर दो-चार कहे
उनमे क्या गुजरी होगी जिन्होने शेर हजार कहे

तेव्हा दु:खाला, वेदनेला डोईजड होऊ न देता, त्यावर विजिगीषु व्रुत्तीने मात करणे अधिक श्रेयसकर.
हे मान्य की असे सल्ले देणे सोपे आहे, हे ही मान्य की दु:ख अपार आहे व ते झेलत जीवन व्यतित करणे अत्यंत कठीण आहे. पण असे करणारे आपण या जगात एकटेच नाहीत. अनेक संत, महात्मे
, राजे-महाराजे यांनाही दु:ख टाळता आले नाही. प्रभु श्रीरामांनाही जेथे १४ वर्षाचा वनवास भोगावा लागला, तेथे आपली काय तह्रा.
आपल्या आजु-बाजुला असे अनेक आदर्श आहेत ज्यांनी दु:खावर, वेदनेवर यशस्वीरीत्या मात केली आहे. तेव्हा दु:खाला शरण न जाता दु:खावर स्वार होऊया, आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया.

खाली एक स्वयंरचित ’गज़ल’ देत आहे.


 वे द ने ची संवेदना

एवढे आले की मज दु:ख आवडाया लागले
अन् सुखाचे मग वावडे वाटाया लागले (१)


रोज मी वेदनेला कुरवाळाया लागलो
अन् तिच्यासाठी जखमाही उकराया लागलो (२)


वेदना शमताच पुन्हा जागवाया लागलो
वेदनेला रोमरोमात भिनवाया लागलो (३)


वेदनेची वासना जेव्हा वाढावया लागली
परमेश्वराकडे वेदनेची कामना कराया लागलो (४)


सुख अव्हेरुन वेदना कवटाळाया लागलो
र्शुंगारासम वेदना भोगावया लागलो (५)


वेदनेच्या नसण्याने व्याकुळ व्हाया लागलो
प्रार्थनेत ही वेदनेची याचना कराया लागलो (६)


वेदनेच्या संवेदनेने बेभान व्हाया लागलो
वेदनेचे हलाहल लिलया पचवाया लागलो (७)


वेदनेच्या धुंदित जेव्हा झिंगाया लागलो
मदिरेसम वेदना तेव्हा प्यावया लागलो (८)


फ़क्त वेदनाचं शाश्वत मानावया लागलो
वेदना सखी-सोबती सर्वां सांगावया लागलो (९)


वेदना अमुल्य/अलौकिक मानावया लागलो
वेदनेला इतरांपासुन लपवाया लागलो (१०)


दुसरयांच्या वेदनेची आस धराया लागलो
त्यांच्या वेदनेला (ही) आपली मानावया लागलो (११)

                              - सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)


द्यानपिठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. दा. करंदिकर यांस मनपुर्वक अर्पण (आदरांजली)


Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957

4 comments:

 1. सौरभ मस्त लिहिले आहे तुम्ही. वेदानेवारची ही कविता आवडली. वेदना नकोत देवा सुख दे पदरामध्ये आयुष्य सुरळीत ठेव न्कोच वेदना मधे मधे असेच आयुष्य सारे जण मागत असताना देवाकडे वेदनाच दे रे बाबा म्हणणारा एखादा निराळाच... वेदना अमुल्य/अलौकिक मानावया लागलो वेदनेला इतरांपासुन लपवाया लागलो (१०) आणि हे असे जेव्हा कोणाला वाटते तेव्हा संत पदाला पोहचल्यासम होते. अप्रतिम कविता. शुभेच्छा.

  ReplyDelete
 2. तुझाकडून एवढ्या सुरेख कविता अपेषित नव्हत्या खूपच सुंदर. अजून सुंदर कविता लिही अभिनंदन वंदना ताई

  ReplyDelete
 3. सुंदर खूपच सुंदर. अप्रतिम गझल, अगदी मन भरून आलं. वेदनेची झिंग आणि वेदनेची वासना, अप्रतिम कल्पना आहे. सुख अव्हेरुन वेदना कवटाळाया लागलो र्शुंगारासम वेदना भोगावया लागलो (५) या भोगवादी प्रवृत्तीच्या युगात वेदनेला शृंगार रसाची उपमा सुद्धा कल्पक आहे. काही नवीन वाचण्याची संधी दिल्या बाबत धन्यवाद.

  ReplyDelete
 4. Good work keep it up there are very few poets who can actually touch your heart n u r one of them thanx for writing such beautiful kavita

  ReplyDelete