Mar 21, 2010

वे द ने ची संवेदना-२ (विस्तिर्ण)

’वेदनेची संवेदना’ ही गज़ल लिहिल्यानंतर, मला आणकी अनेक रुपक, कल्पना सुचल्या, त्यांना मी आधीच्या ’वेदनेची संवेदना’ या काव्याला जोडणी (extension) म्हणून देत आहे.

हिंदीतील महाकवी श्री. हरिवंशराय बच्चन यांचे ’मधुशाला’ हे काव्य मी वाचले आहे. मधुशालेने मला खुपच प्रभावित केले.  मधुशालेनेचा माझ्या मनावरील पगडा एवढा जबरदस्त होता/आहे की एकवेळ मला अख्खी
’मधुशाला’ मुखोग्दत होती.
श्री, हरिवंशराय बच्चन यांनी मनातील विविध अवस्थांनाच प्रतिक बनवले आहे आणि हाला, प्याला, साकी, मधुशाला यांना घेऊन अनेक सुंदर कल्पनांवर भाष्य केले आहे.

माझ्या मते ’मधुशालेचा’ प्रभाव ’वेदनेची संवेदना’ वर प्रामुख्याने जाणवतो, नव्हे मधुशालेनेच मला प्रेरित केले आणि म्हणूनचं हे ’वेदनेची संवेदना जोडणी’ (extension) मी श्री, हरिवंशराय बच्चन यांना मनपूर्वक अर्पण करित आहे.

’वेदनेची संवेदना जोडणी’ (extension) देत आहे, ’वेदनेची संवेदना’ काव्यासाठी आधीचे याच नावाने असलेले पोस्ट पाहावे ही विनंती.






वे द ने ची संवेदना-२

सामर्थ वेदनेचे धडकी भरवाया लागले
अन् सारे वेदनेला शरण जावया लागले (१२)


साम्राज्य वेदनेचे चौदिशा वाढाया लागले
लोक वेदनेचे मांडलिक व्हाया लागले (१३)


(मी) वेदनेच्या मोहात फसण्या लागलो
मजला वेदनेचे लावण्य भुलवू लागले (१४)


मातेसम वेदना मज पाजु लागली
वात्सल्यरुपी वेदनेचे रुप पाहु लागलो (१५)


वेदना सूर्यासम मज झोकाळू लागली
तिमिराकडून तेजाकडे नेऊ लागली (१६)


वेदना सागरासम मज खोली देऊ लागली
शिंपल्यातील अमुल्य मोती बनवू लागली (१७)


वेदना छिन्नीसम मजला तराशू लागली
सुंदर- सुबक शिल्प साकारु लागली (१८)


वेदना मज काव्यत्म आयाम देऊ लागली
अत्तुच्च प्रतिभेचा साषा(क्ष)त्कार घडवू लागली (१९)


आकाशासम वेदना मज विस्तारु लागली
अन् सामावण्याच्या कषा(क्ष) रुंदाऊ लागली (२०)


अनंतरुपी वेदनेचे दर्शन घडण्या लागले
प्रतिक्षण वेदनेचा कुंदन बनवाया लागला (२१)


वेदना गुरुसम मज घडवाया लागली
प्रतिदिन गुरु दषि(क्ष)णा मागाया लागली (२२)


मीही अर्जुनासम वेध घ्याया लागलो
एकलव्यासम अंगठा द्याया लागलो (२३)


कल्पतरुसम वेदना वाछित देऊ लागली
आधीच फाटकी झोळी (माझी) सांडण्या लागली (२४)


वेदना प्रस्थापित समजूती हलवू लागली
नव द्रुष्टीकोनाचे  दर्षन घडवू लागली (२५)


मीही वेदचे उपकार मानाया लागलो
तिच्या ऋणात राहाण्या लागलो (२६)


वेदनेने सारे पांडित्य गळाया  लागले
अन् अंतिम सत्य समजा या लागले (२७)


वेदना जळी-स्थळी-काष्ठी व्यापाया लागली
मज महाकाय विश्वरुप दाखवाया लागली (२८)


वेदनेच्या भावनेत वाहावया लागलो
वेदना एकाकीपणे सोसावया लागलो (२९)

मीही अंतर्मुख व्हावया लागलो

वेदनेवर चिंतन करावया लागलो (३०)

दु:ख, दारिद्र, वेदना खिन्न कराया लागले

आनंदाचे ही मज ऒझे वाटावया लागले (३१)


वेदना गात्रे शांत कराया लागली, मज
पंच महाभूतात विलीन करण्या लागली (३२)

वेदनेने मीही पुण्यकर्म करण्या लागलो

स्वर्गाचे दार ठोठावया लागलो (३३)

वेदना अंतचक्ष(ऊ) उघडाया लागली

ड्यानेद्रिये तीश्ण कराया लागली (३४)

वेदनेमुळे कविता जगाया लागलो, मीही

रोज नवे काव्य कराया लागलो (३५)






              - सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)




Copyrighted Literature / Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957

No comments:

Post a Comment