Mar 15, 2010

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज गुढीपाडव्या निमित्त, सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्ष सगळ्यांना आनंदाचे, उत्साहाचे जावो ही प्रभु श्रीरामांच्या चरणी प्रार्थना

आला आला गुढीपाडवा, स्वागत करुया नववर्षाचे
बांधुनी गुढी आपुल्या दारी,  स्वागत करुया श्रीरामांचे

आजच्या दिवशी प्रभु श्रीराम, माता सिता, भ्राता लक्षमण १४ वर्षाचा वनवास संपवुन अयोध्येत परतले. मांगल्याचा वाईटावरील विजय साजरा करण्यासाठी व श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी अयोध्यावासीयांनी गुढया उभारल्या.


या मंगल समयाचे वर्णन करणारी एक स्वरचित कविता प्रभु श्रीरामांच्या चरणि अर्पण करित आहे.
वनवासी श्रीराम परतले घरी
बहुत बरस राहिले वनी
हर्षले नगरजन, आले स्वागत करण्या
आनंदले पाहुनी श्रीरामांसी 
संगे माता सिता, भ्राता लक्षमणासी
रोमांचित क्षण ते होते
वाटेवरती फ़ुलांचे सडे
वाजती सनई आणि चौघडे
लाडका राजपुत्र येता क्षणी
बांधती अयोध्यावासी गुढी
आला दुग्ध-शर्करा योग
पाहुनी तयांचे मुखकमल
जयघोष करती जन
काय सांगावे वर्णन त्या समईचे
पडे माझी प्रतिभा तोकडी
-सौरभ

No comments:

Post a Comment