Mar 3, 2010

शिवजयंतिच्या निमित्ताने

शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप
                      - समर्थ रामदास

सगळ्यांना शिवजयंतिच्या हार्दिक शुभेच्छा.

वरिल प्रमाणे शिवरायांचे गुण आणि त्याचा पराक्रम आठवण्यापेशा आपण त्यांच्या जन्मदिना बद्दल वादविवाद, चर्चा करतोय. शिवजयंतिची सगळ्यांनी एक इवेंट (event) करुन टाकली आहे. शिवरायांच्या कार्याची ओळख करुन घेणे, शिवरायां सारखे आचरण करण्यापेक्शा शिवजयंति साजरी करणे अधिक सोपे आहे.

छ्त्रपतिंन नंतर त्यांच्या तोडिचे व्यक्तिमत्व, काही सन्माननिय अपवाद वगळता महाराष्र्टा मध्ये (मुख्यत: हल्लीच्या काळात स्वातंत्रानंतर) का निर्माण होऊ शकले नाही याचे उत्तर आपल्याला मिळेल. यामुळेच बहुदा "शिवाजि जन्मावा तो दुसरयाच्या घरात, माझ्या नको" या वाकप्रचाराचा जन्म झाला असावा.

शिवरायांनी घेतलेले सतिचे वाण अत्यंत कठिण आहे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून,  त्यांचा पावलावर पावले टाकणे तर त्याहूनही कठीण; पण अशक्य नक्की नाही. पण हा महाकठीण मार्ग धरण्यापेक्शा मोठ्याप्रमाणात वाजत गाजत शिवजयंति साजरे करणे अधिक सोपे आहे. व हाच मार्ग स्वत: ला शिवरायांचे अनुयायी म्हणवणारे (व शिवराय म्हणजे आपलीच मक्तेदारी समजणारे) राजकारणी अनुसरतात.

शिवरायांचे नाव घेतले की मते मिळतात, लोकांच्या भावना भडकावता येतात. तरी सुजाण जनतेने या सापळ्यात न पडता शिवचरित्र अंगी बाणण्याचा प्रयत्न करावा, तीच शिवरायांना खरी मानवंदना ठरेल.

छ्त्रपतिशिवाजीमहाराजकी जय़, जय महाराष्र्टा.

No comments:

Post a Comment