Mar 17, 2010

ग़ज़लइतरांप्रमाणे ग़ज़ल किंवा उर्दू शायरीशी माझी प्रथम ओळख हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून झाली. ग़ज़ल ची दिलखेचक आशिकी अदा मनामध्ये लगेचच घर करुन गेली. थोडया, मोजक्याच शब्दात बरेच काही सांगण्याची हतोटी असलेला हा काव्य प्रकार उर्दू आणि हिंदी एवढाच मराठी मध्येही लोकप्रिय आणि प्रचलित आहे.


पर्शियन भाषेत ’ग़ज़ाल’ या शब्दाचा अर्थ हरिण असा आहे. हरिणाच्या पाड़साला ’ग़ज़ाल’ असे म्हणतात. हरिण या शब्दातचं हालचालीतील लालित्य आणि सौदर्य अभिप्रेत असल्यामुळे कदाचित अत्यंत नाजुक हळव्या भावना साकारणारया काव्यप्रकाराला ’ग़ज़ाल’ हे नाव दिले गेले असावे. (१)


या आवडितूनचं "नजराणा शायरीचा" हे संगिता जोशी यांचे पुस्तक विकत घेतले, आणि आधाशासारखे वाचुन काढले. त्यातूनचं आणखी गोडी निर्माण झाली, मग प्रा. डाँ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "ग़ज़ल" हे पूर्णपेणे या विषयाला वाहिलेले पुस्तक वाचले. त्यातील शायरी बरोबरच मीर तकी मीर, मिर्ज़ा ग़ालिब, फ़िराक़ गोरखपुरी इ. थोर शायरांची छोटेखानी तोंडओळख झाली. (२)  मिर्ज़ा ग़ालिब यांना कोण ओळखत नाही.


मराठीमध्ये प्रथम ग़ज़ल कोणि आणली यावरुन अभ्यासकांनमध्ये मतभेद आहेत. योगिराज ड्न्यानेश्वर (शब्द नीट न लिहील्याबद्दल शमस्व) आणि रामदास यांच्या रचनेत अनेक ग़ज़लसद्रुश रचना आढळतात.
कविवर्य अम्रुतराय यांनी स्वच्छ ग़ज़लरचना केल्या. त्यानंतर माधव ज्युलियन, सुरेश भट यांनी ग़ज़ल मराठीत लिहील्या. पण ग़ज़ल मराठीमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय निर्विवादपणे सुरेश भट यांनाचं जाते. (३)

त्यानंतर अनेकांनी मराठीमध्ये ग़ज़ल लिहील्या प्रा. डाँ. सुरेशचंद्र नाडकर्णी, राजेद्र अत्रे, बजरंग सरोदे, इलाही जमादार इ. हा काव्य प्रकार समर्थपणे हाताळला.

ग़ज़ल गायक भिमराव पांचाळ यांनी आपल्या रसाळ गायकिने ग़ज़ल समस्त रसिकांनपर्यंत पोहोचविली, हल्ली त्यांचे लोकसत्तामधील ग़ज़लेवरील छोटेखानी सदर अत्यंत वाचनिय असते.

मला स्वत:ला ग़ज़ल, उर्दू शायरी खुप आवडते, त्यातूनच मीर तकी मीर, मिर्ज़ा ग़ालिब, सुरेश भट यांच्या अनेक ग़ज़ला मी पाठ केल्या आणि कुठे संधी मिळताच (घरगूती बैठक, मैफ़िलींमध्ये) म्हणुन  दाखवल्या.
या थोर ग़ज़लकारांकडुन प्रेरणा घेऊन मीही काही रचना केल्या आहेत, खाली त्यापैकीच एक स्वत: केलेली ग़ज़ल देत आहे.

संदर्भ :  (१), (२), (३) :  "ग़ज़ल" प्रा. डाँ. सुरेशचंद्र नाडकर्णी 
          
टिप  :  वरिल मान्यवरांचे चित्र
             (१) मिर्ज़ा असदुल्ला खाँ ’ग़ालिब’
             (२) मीर तकी ’मीर’
             (३) सुरेश भट
’माझी ग़ज़ल’

ना मी माझा, ना मी कुणाचा राहिलो
एकटा आलो इथे, मी एकटा हा चाललो

काय सांगावे जगिची आगळीच आहे तह्रा
राहुनी गर्दित सारया, एकटा मी आहे बरा

का कुणा जाउन सांगु माझिया मनाची व्यथा
येथला हर एक आहे आपल्या दुनियेत सदा

जाणिवाच सगळ्यांच्या आहेत जेथे गोठलेल्या
मी तरी राहु कसा अपवाद तेथे एकला

                                    - सौरभ

ग़ज़ल मराठीमध्ये लोकप्रिय करणारया कविवर्य सुरेश भट यांना मनपुर्वक समर्पित.


2 comments:

  1. wow so gud.....aayushyache katu satya ahe he......kharach chhan ahe :)

    ReplyDelete
  2. नवकलाकाराला, त्यातही नवकवीला दर्दी रसिकांची दाद ही प्राणवायू सारखी असते, तिच्याविना नवकलाकाराची कला गुदमरण्याचा धोका असतो. आपल्या सारख्या रसिकांची मनपूर्वक दादचं अशावेळी काठीचा आधार असते, धन्यवाद जया :)))

    ReplyDelete