Apr 7, 2010

कुणाकुणाचे ???? new poem

            
कुणाकुणाचे ????

नरडयास लागती जबडे कुणाकुणाचे ??
विकाया निघाले हे भडवे कुणाकुणाचे ??
रात्री आक्रंदती हे रडवे कुणाकुणाचे ??
भक्तांस मारती हे बडवे कुणाकुणाचे ??
मातीत गाडती हे मढवे कुणाकुणाचे ??
उकराया निघाले हे थडगे कुणाकुणाचे ??
कोर्टात लढती हे खटले कुणाकुणाचे ??
रंग बदलती हे सरडे कुणाकुणाचे ??
शुभ कार्यात येती हे आडवे कुणाकुणाचे ??
झेलाया लागती हे नखरे कुणाकुणाचे ??
बेशरम फिरती हे नागडे कुणाकुणाचे ??
गाण्यात ऎकले हे मुखडे कुणाकुणाचे ??
खुशाल झिंगती हे बेवडे कुणाकुणाचे ??
पायात घालती हे तंगडे कुणाकुणाचे ??
हैदोस घालती हे माजोरडे कुणाकुणाचे ??
फांदीवर हे पारवे कुणाकुणाचे ??
बाहेर सांडलेले हे चांदणे कुणाकुणाचे ??
साजरे करती हे पाडवे कुणाकुणाचे ??
शिस्तीत बैसलेले हे करडे कुणाकुणाचे ??
काढाया लागती हे रुसवे कुणाकुणाचे ??
बाजुस झुकती पारडे हे कुणाकुणाचे ??
काम टाळती हे उडवे कुणाकुणाचे ??
दुखाया लागती हे गुढगे कुणाकुणाचे ??
लोकांस मारती हे तगडे कुणाकुणाचे ??
फुंकत फिरती हे उकिरडे कुणाकुणाचे ??

 - सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)

No comments:

Post a Comment