Apr 9, 2010

आणखी एक गज़लअंधा-या काळरात्री लुकलुकती लाखो तारे
दिवसा उजेडी मात्र पळती कुठे हे तारे

मांडुनी संसार सारा गेला कुठे कळेना
अचंभित होती येऊन पाहणारे

स्वप्नात पाहिले मी चेहरे ओळखीचे
उठता विरुन जाती स्वप्नी पाहिलेले

भेडसावती प्रश्न काळिज कोरणारे
बोलुनी टाकुया ह्रदयातील सारे

टपलीत मारती, मागुन चालणारे
फुत्कारातील माझ्या, संपले निखारे

विश्वास टाकुनी भलता प्रमाद केला
विषादास आता, देहात जीव नाही

पाठिवर फिरणारे हात ओळ्खिचे
गर्दित गारद्यांच्या कोणास पोच नाही

       -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)

1 comment: