Apr 27, 2010

एकजुटीचा ऎलान

आपण एक आहोत मनाने, आत्माने सांगावेसे वाटते
सगळ्यांना जवळ करुन, विसरुन वैर ऒरडावेसे वाटते
आपण एक आहोत..................


ताजमहालाच्या साषीने, विसरुन हेवेदावे, प्रेम करावे


आयफेलच्या मनो-यावर चढुन बंधुतेचा, समानतेचा,
स्वातंत्र्याचा संदेश सांगावा


चीनच्या भींतीवरुन धावत, झुगारुन पायातील श्रुंखला
आनंदाने किंचाळावे, आपण एक आहोत, मनाने
सांगावेसे वाटते.....................


रोमच्या कँलोसियमसारखे मनाला विस्तारुन ,
सगळ्यांना आपल्या कवेत घ्यावेसे वाटते


स्वातंत्र्यदेवते समोर शपथ घेऊन, (व्यक्ती)
स्वातंत्र्याचा ऎलान करावेसे वाटते


स्फिऩच्या (Pyramid of Sphinx) पायथ्याशी बसून
विस्तिर्ण वाळवंटात स्वत:ची ऒळख विसरुन
एकत्र यावेसे वाटते, आपण एक आहोत..........बर्लिन भींतीच्या अवशेषांना स्मरुन, तोडुन सगळ्या
वर्ण, रंग, भाषा, धर्म यांच्या भींती
सगळ्याना मिठीत घेऊन सांगावेसे वाटते

आपण एक आहोत मनाने, आत्माने सांगावेसे वाटते
सगळ्यांना जवळ करुन, विसरुन वैर ऒरडावेसे वाटते
आपण एक आहोत..................

-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)

No comments:

Post a Comment