Apr 30, 2010

अनेक होत्या (गज़ल)

आठवणींचा तुझ्या नव्हता कुठेचं तोटा
ह्रदयास जाळणा-या ज्वाला अनेक होत्या (१)

सांभाळू कसा ’मी’ समाधीस माझ्या
पडद्यावर नाचणा-या मेनका अनेक होत्या (२)

आयुष्य संपवावे वाटले परंतु, जगण्यास
लावणा-या इच्छा अनेक होत्या (३)

बहकणा-या यौवनात साधाच राहिलो ’मी’
नादास लावणा-या वासना अनेक होत्या (४)

का? कसा? कशाला? भेदभाव करु ’मी’
सर्वश्रेष्ठ माझ्या रचना अनेक होत्या (५)

लपवू कसे लावंण्यास माझ्या, रस्तावर
वखवखणा-या नजरा अनेक होत्या (६)
    
                       -सौरभ सुधीर परांजपे

No comments:

Post a Comment