May 18, 2010

लेखणीस चालवत गेलो (गज़ल)




लेखणीस माझ्या धार लावत गेलो
व्यवस्थेवर सपासप वार करत गेलो (१)

कलमास माझ्या नव्याने चालवत गेलो
ढोंगी राजकारण्यांना ऊघडे पाडत गेलो (२)

प्रस्थापितांना नव आव्हान देत गेलो
विखारी सापांना पायदळी ठेचत गेलो (३)

नवविचारांचा आगाज करित गेलो
धर्मांधांचे टराटरा बुरखे फाडत गेलो (४)

छाताडावर टिकांचे वार झेलत गेलो
शब्दांस माझ्या ढाल बनवित गेलो (५)

झुंडशाहीला शब्दांनी नेहमी ठोकीत गेलो
(व्यक्ति) स्वातंत्र्यास जिवापाड जपत गेलो (६)


                     -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)

2 comments:

  1. सौरभ तुझ्या गजलेला लावलेली चाल खालच्या दुव्यावर ऐक.
    http://www.divshare.com/download/11461305-a8c

    ReplyDelete
  2. अत्यानंदजी, खुपच छान चाल लावली आहे.
    आपण माझ्या एका शब्दाखातर, वेळात वेळ काढुन चाल लावलीत त्याबद्दल धन्यवाद.
    माझ्या आईला ऎकविली, तर तिला जास्त आनंद झाला.
    आपण आपल्या नावाप्रमाणेच आम्हाला अत्यानंद दिला.

    ReplyDelete