May 19, 2010

माझ्या आजीच्या तिन मुली


मुलासाठी व्रतवैकल्य करणारे
वंशाच्या दिव्यासाठीसाठी हट्ट करणारे
मुलगा नाही म्हणून सुनेला छळणारे 
पाहिले की मला आठवतात 
माझ्या आजीच्या तिन मुली

प्रेमळ, समजुतदार, संवेदनाशील
मुलाची कमी जाणवू ’न’ देणा-या
मुलाच्याही वर्ताण आहेत
माझ्या आजीच्या तिन मुली (१)

मुलाने मदती ऎवजी कामे वाढवली असती
त्याचीच बडदास्त ठेवावी लागली असती
यामात्र लहानपणापासुन मदत करतात
धुणी-भांडी, स्वयंपाक करतात
माझ्या आजीच्या तिन मुली (२)

मुलाने वृध्दाश्रमात टाकले असते
या म्हातारपणात आजी-आजोबांची
काळजी घेतात
दुखणे, खुपणे, आजारपण करतात
काय हवे नको ते विचारतात
माझ्या आजीच्या तिन मुली (३)


हल्लीची मुले सुनेचे ऎकतात
आईला गप्प करतात
यामात्र समजून-उमजून
प्रेमाने सगळ करतात
माझ्या आजीच्या तिन मुली (४)

मुलागा नाही याचे आजी-आजोबांची
कधी दु:ख, नव्हते, खेद नव्हता
त्यांच्या मुली कर्तबगार आहेत
माणुसकीचा झरा आहेत
माझ्या आजीच्या तिन मुली (५)

वयपरत्वे आजी खुपच वाकल्ये
तिच्या मुलींच तिचा आधार
तिच्या म्हातारपणाची काठी
तिच्या पाठीचा कणा आहेत
माझ्या आजीच्या तिन मुली (६)

           -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)

No comments:

Post a Comment