May 4, 2010

आनंदि आनंद गडे


आज मी खुप आनंदात आहे, तसा नेहमीच असतो म्हणा.
पण आज अत्यानंदात आहे, कारणच तस आहे.

आज माझी ३ री कविता ई-सकाळ मध्ये आली. आणि मी राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत ’वेदनेची संवेदना’ या कवितेचे अभिवाचन केले. उत्तेजनार्थ प्रमाणपत्र (certificate) मिळाले, खुप मजा आली आणि चांगला अनुभव मिळाला.गज़लकार सुरेश भट यांचे शिष्य प्रदिप निफाडकर यांना मी काही रचना पाठवल्या, त्याना त्या आवडल्या. तसेच मला मार्गदर्शन करण्याचेही मान्य केले, त्यासाठी मला त्यांनी पुण्याला बोलावले आहे, खुपच भाग्याची व आनंदाची गोष्ट आहे. म्हणूनचं एवढा तोंड फाटेसतोवर हसतो आहे.

हाSSSSहाSSSSSहाSSSSSहाSSSSSहाSSSSSहाSSSSSखाली ई-सकाळच्या तिनही लिंक देत आहे.

No comments:

Post a Comment