Apr 23, 2010

मी कविता करायला लागलो



मी कविता करायला लागलो
---------------------------------------------
कधी कधी मीही लिहायला लागलो
चार-दोन ऒळी खर्डायला लागलो
इकडून-तिकडून, ऒढुन-ताणून
शब्द मांडुन, यमक जोडायला लागलो
आणि त्याला, कविता म्हणायला लागलो
मीही कविता करायला लागलो

कुठल्याही विषयावर काव्य करु लागलो
नाही मिळाला, तर शोधायला लागलो
चारदोघांना, हळूच ऎकवायला लागलो
कविता करतो, अभिमानाने सांगायला लागलो

थोडी दाढी वाढवून, अस्ताव्यस्त केस
स्वत:च्याच तंद्रित रहायला लागलो
मोरोपंत, कुसुमाग्रज, विंदा, अशी नावे
एकाच दमात घ्यायला लागलो

घोळक्यात बिनदिक्कत कविता म्हणून
कोणाला आवडो वा न आवडो
आपली मते मांडायला लागलो
मधेच जडबंबाळ शब्द वापरायला लागलो

कधी कधी मीही लिहायला लागलो
चार-दोन ऒळी खर्डायला लागलो
              
              -सौरभ सुधीर परांजपे



                        फोटोतील आदरणिय व्यक्ति - (१) कुसुमाग्रज, (२) विंदा करंदिकर, (३) ग्रेस

No comments:

Post a Comment